शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी पाली गावातील ५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 09:24 IST

उत्तन सागरी पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना मद्यधुंद टोळक्याने मारहाण केल्या प्रकरणी पाली गावातील ५ आरोपीना पोलिसांनी अटक केली

मिरारोड - उत्तन सागरी पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना मद्यधुंद टोळक्याने मारहाण केल्या प्रकरणी पाली गावातील ५ आरोपीना पोलिसांनी अटक केली असून त्यांना २३ जून पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे . 

सोमवारच्या मध्यरात्री दरम्यान सहाय्य्क फौजदार बाळासाहेब कोळी व हवालदार संजय शिवलकर हे दोघे बीटमार्शल  दुचाकीवरून  तरोडी , चौक अशी गस्त घालून पाली गावात आले . त्यावेळी तेथील पेट्रोल पंप जवळ ५ जणं मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरडा करत होते . शिवलकर यांनी , इतक्या रात्री काय आरडा ओरडा करता , घरी जावा असे सांगताच एकाने येऊन त्यांच्या कानशिलात लगावली . मागे बसलेल्या कोळींनी त्याला रोखताच अन्य चौघा साथीदारांनी येऊन दोघा पोलिसांना शिविगाळ करत मारहाण सुरु केली . त्यांना फरफटत नेले . कोळी यांचे शर्ट फाडून डोळ्यावर बुक्का मारल्याने जखम झाली आहे .

या घटनेनंतर आरोपी पळून गेले होते .  अखेर पोलिसांनी सर्व पाच हि आरोपीना अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले . गॉडफ्री फर्नांडिस ( २७) , लॉइड सोज (३०), रॅम्बो बावेघर (२२) , बॅण्डम गोन्साल ( २४) व सनी भंडारी (२०) अशी पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणी अटक आरोपींची नावे आहेत . हे सर्व पाली गावचे राहणारे असून भंडारी याचे घटने आधी एका पार्टीत पण भांडण झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले . 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकmira roadमीरा रोड