विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
By Admin | Updated: June 12, 2016 04:03 IST2016-06-12T04:03:36+5:302016-06-12T04:03:36+5:30
सासरच्या मंडळींच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून कीर्ती शिंदे (२३, रा. बिर्ला कॉलेज रोड, गौरीपाडा) हिने आत्महत्या केल्याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
कल्याण : सासरच्या मंडळींच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून कीर्ती शिंदे (२३, रा. बिर्ला कॉलेज रोड, गौरीपाडा) हिने आत्महत्या केल्याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.
कीर्तीच्या आत्महत्येस सासरची मंडळी जबाबदार असल्याची तक्रार तिचे वडील संतोष सावंत (४५, रा. वारजे, जिल्हा पुणे) यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात केली होती. त्याआधारे पोलिसांनी पती राहुल शिंदे, सासू लीलाबाई, नणंदा मोहिनी, चांदणी शिंदे व रोहिणी जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अजूनही कोणाला अटक केलेली नाही.(प्रतिनिधी)