शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

नवजात बालकांसाठी कळवा रुग्णालयात पाच अत्याधुनिक व्हेटींलेटर होणार उपलब्ध, आयसीयुसाठी देखील व्हेटींलेटर घेण्याचा पालिकेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 4:18 PM

नवजात बालकांसाठी आता कळवा रुग्णालयात अत्याधुनिक स्वरुपाचे पाच व्हेटींलेटर घेण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ४ कोटी ५२ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

ठळक मुद्देआयसीयुसाठी देखील नवे व्हेटींलेटर होणार उपलब्धएकूण २० व्हेटींलेटर केले जाणार खरेदी

ठाणे - ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात असलेल्या एनआयसीयु विभागासाठी आता पाच अत्याधुनिक स्वरुपाचे व्हेटींलेटर घेण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. तसेच आयसीयु विभागासाठी देखील व्हेटींलेटर घेतले जाणार असून असे एकूण २० व्हेटींलेटर खरेदीचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या  महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.                   ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात व्हेटींलेटरची अपुरी असलेली सुविधा आणि कळवा रुग्णालयात देखील ही सुविधा पुरेशी नसल्याची वृत्त यापूर्वी लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर आता उशिराने का होईना महापालिकेचे कळवा रुग्णालय आता जागे झाले आहे. त्यानुसार त्यांनी पाच नग व्हेटींलेटर घेण्याचा निर्णय घेतला आहे. कळवा रुग्णालयात दाखल होत असलेल्या आंतरुग्णांची संख्या ही ५०० च्या घरात आहे. तर दरवर्षी २५००० च्या आसपास रुग्ण औषधोपचरासाठी दाखल होतात. रुग्णालयात सध्या अस्तित्वात असलेल्या अतिदक्षता विभागाची क्षमता १० खाटांची असून वर्षाला येथे एक हजारांच्या आसपास रुग्ण दाखल होत आहेत. तर ४० खाटांचे बालरुग्ण कक्ष व १० खाटांचे नवजात बालकांसाठीचे अतिदक्षता कक्ष असून या विभागामध्ये बालकांवर व नवजात अर्भकांवर उपचार करण्यात येतात. सध्या येथे ८ ते १० च्या आसपास व्हेटींलेटरची सुविधा उपलब्ध असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. परंतु या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या  रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कमी वजनाच्या व कमी दिवसांच्या उपचारासाठी दाखल होणाºया अर्भकांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळेच आता रुग्णालय प्रशासनाने येथे व्हेटींलेटरची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एकूण २० व्हेटींलेटर घेतले जाणार आहेत. त्यातील ५ नग व्हेटींलेटर हे बालरोग व नवजात अतिदक्षता विभागासाठी घेतले जाणार आहेत. यासाठी ३ कोटी ३५ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर पाच वर्षांसाठी निगा देखभाल करण्याचा खर्च हा १ कोटी १७ लाख २५ हजार एवढा आहे. त्यानुसार एकूण ४ कोटी ५२ लाख २५ हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhospitalहॉस्पिटल