शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत आढळले आणखी पाच रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 01:47 IST

एकूण ५५: ठाणे जिल्ह्यातील अन्य महापालिका व पालिका रुग्णांच्या तुलनेत संख्या सर्वाधिक

कल्याण : केडीएमसी हद्दीत रविवारी आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याने महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या ५५ झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्य महापालिका व पालिकांच्या हद्दीतील रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे.

डोंबिवलीत पूर्वेत रविवारी १९ वर्षांच्या तरुणाला, तर कल्याण पूर्वेतील १२ आणि १५ वर्षांच्या दोन मुलींसह १५ वर्षांचा मुलगा आणि ४३ वर्षीय पुरुषाला कोरोना झाला आहे. महापालिका हद्दीत आतापर्यंत डोंबिवली पूर्वेत सर्वाधिक १९ रुग्ण, तर टिटवाळा परिसरात दोन रुग्ण सापडले आहेत.दुसरीकडे उपचारांदरम्यान दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीतील १२ कोरोनाबाधितांना उपचारांती घरी सोडले आहे. त्यामुळे सध्या ३७ जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दिव्यात शनिवारी एक कोरोना बाधित आढळल्याने तेथे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली. तसेच ठाणे महापालिकेने व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दिव्यातील कोरोना संशयितांची चाचणी करावी. तसेच निर्जंतुकीकरण, धूर फवारणी करावी, अशी मागणी केली आहे.सहा महिन्यांचे बाळ सुखरूप घरी परतलेकल्याणमधील सहा महिन्यांच्या बाळाने कोरोनावर मात केल्याने त्याला शनिवारी कस्तुरबा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बाळ व त्याच्या आईला घेऊन रुग्णवाहिका त्यांच्या सोसायटीत येताच इमारतीतील रहिवाशांनी त्यांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले, अशी माहिती मनसेच्या नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी दिली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या