पाच वर्षात पाच लोकल

By Admin | Updated: October 18, 2014 01:22 IST2014-10-18T01:22:12+5:302014-10-18T01:22:12+5:30

रेल्वे अर्थसंकल्पात नव्या घोषणा रेल्वे मंत्र्यांकडून केल्या जात असतानाच यातील अगदी तुटपुंज्या घोषणा मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांच्या वाटय़ाला येतात.

Five Local in Five Years | पाच वर्षात पाच लोकल

पाच वर्षात पाच लोकल

सुशांत मोरे - मुंबई
रेल्वे अर्थसंकल्पात नव्या घोषणा रेल्वे मंत्र्यांकडून केल्या जात असतानाच यातील अगदी तुटपुंज्या घोषणा मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांच्या वाटय़ाला येतात. 
गेल्या पाच वर्षात फक्त पाच नव्या लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात आल्या असून, दोन वर्षात एकही नवी लोकल किंवा फेरीही वाढलेली नसल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 1क् वर्षात मध्य रेल्वेमार्गावर केवळ 28 नव्या लोकलची भर पडली आहे. 
सध्या लोकलमधील प्रवास हा जीवघेणा झाला आहे. गर्दीच्या वेळेत तर प्रवास करणोही जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे लोकल गाडय़ा वाढवा आणि फे:याही वाढवा, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जाते. मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या लोकल गाडय़ा आणि त्यांच्या फे:यांची गेल्या 1क् वर्षातील आकडेवारी पाहिली असता लोकल प्रवाशांच्या वाटय़ाला फारच कमी नवीन लोकल आल्याचे समोर आले आहे. 2क्क्4 साली मध्य रेल्वेकडे 93 नवीन लोकल होत्या. त्या वेळी 1 हजार 18क् फे:या लोकलच्या होत होत्या, असे रेल्वेतील सूत्रंनी सांगितले. आता 2क्14 साली मध्य रेल्वेच्या ताफ्यात 121 नवीन लोकल असून, त्याच्या 1 हजार 618 फे:या होत असल्याचे सांगण्यात आले. हे पाहता केवळ 28 नवीन लोकलची भर पडली आहे, तर 438 फे:या वाढलेल्या आहेत.  
गेल्या 1क् वर्षात केवळ 25 टक्केच वाढ लोकल गाडय़ा व फे:यांमध्ये झाली असल्याचे रेल्वेतील सूत्रंनी सांगितले. गेल्या पाच वर्षात तर केवळ पाच नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात आल्या असून, यामध्येही 2क्1क्-11 आणि 2क्12-13 मध्येच लोकलची आणि फे:यांची वाढ झाली आहे.
 
च्लोकल आणि फे:या वाढत नसल्यामुळे प्रवाशांना मोठय़ा गर्दीला सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेमार्गावर असणा:या टर्मिनलचाही गेल्या 1क् वर्षात हवा तसा विकास न झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
 
च्हार्बरवरील अंधेरीचा गोरेगावर्पयत विस्तार, 12 डबा लोकलसाठी प्रयत्न, डीसी-एसीचे झालेले काम, बेलापूर ते उरण लोकल लाइनचे काम, दिवा ते ठाणो पाचवा-सहावा मार्ग यामुळे भविष्यात लोकल गाडय़ा आणि फे:यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
 
 
20101161,556
 
20111171,573
 
20121171,578
 
20131211,618
 
20141211,618

 

Web Title: Five Local in Five Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.