लोकसहभागातून पालघर जिल्ह्यात पाच कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST2021-05-23T04:40:25+5:302021-05-23T04:40:25+5:30
ठाणे : भाजप केवळ विरोधाला विरोध म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका करत नाही तर प्रत्यक्ष कृतीतून जनतेला सेवा सुविधाही देण्याचे काम ...

लोकसहभागातून पालघर जिल्ह्यात पाच कोविड केअर सेंटर
ठाणे : भाजप केवळ विरोधाला विरोध म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका करत नाही तर प्रत्यक्ष कृतीतून जनतेला सेवा सुविधाही देण्याचे काम करत आहे. पालघर जिल्ह्यात लोकसहभागातून पाच ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे पालघर जिल्ह्याचे प्रभारी तथा आमदार संजय केळकर यांनी दिली.
विक्रमगड येथे शनिवारी लोकसहभागातून उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उदघाटन केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कोविड केअर सेंटरसाठी मॅड या संस्थेने जागा दिली असून, कर्मचारीही उपलब्ध करून दिले आहेत. ४० खाटांचे हे सेंटर असून, चार डॉक्टर, कर्मचारी आणि विविध सोयी-सुविधांसह चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही आहेत. लवकरच मोखाडा आणि पालघर येथे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. हेमंत सवरा, बाबाजी काटोळे, प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच हरीश शाह आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.