शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भिवंडीत इमारत कोसळून तीन ठार, ९ जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 06:46 IST

भिवंडी : शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चारमजली इमारत शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळून त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.

भिवंडी : शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चारमजली इमारत शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळून त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यात नऊ जण जखमी झाले असून, पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीचा मालक महमद ताहीर रफीक बिजनोर (४९) याला पोलिसांनी अटक केली आहे.रुख्सार याकूब खान (१८), अश्फाक मुश्ताक खान (३८), जैबुन्निसा रफीक अन्सारी (६१) अशी मृतांची नावे आहेत. रुख्सार आपल्या कुटुंबासह या इमारतीत राहत होती, तर एकूण नऊ जखमींपैकी ख्वाजा मोहम्मद सय्यद (५५), रेहान खान (६), सलमा ताहीर अन्सारी (५५), आबीद याकूब खान (२१), आसीफ याकूब खान (२१) हे गंभीर जखमी झाल्याने, त्यांना ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, तर शकील अल्लादीया अन्सारी (३७), याकूब युसूफ खान (५८) साबीरा याकूब पठाण (४५) व इमराना खान (२२) यांच्यावर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आजूबाजूला दाट वस्ती असल्याने, बचावकार्य करणा-या कर्मचा-यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण झाले. त्यात बघ्यांची गर्दी होती. पाच वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या या इमारतीची माहिती प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांच्याकडे उपलब्ध नव्हती. आपण काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारल्याचे सांगत, जबाबदारी त्यांनी झटकून टाकली. घटनास्थळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, महापौर जावेद दळवी, आमदार महेश चौघुले, रूपेश म्हात्रे, उपमहापौर मनोज काटेकर, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, तहसीलदार शशिकांत गायकवाड, उपायुक्त विनोद शिंगटे यांनी भेट देऊन, जखमी व मृतांच्या नातेवाइकांची विचारपूस केली.>क्लस्टर योजना राबविण्याची सूचनापालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करून, ठाण्याच्या धर्तीवर तेथे क्लस्टर योजना राबविण्यासाठी पालिका अधिकाºयांना सांगितले, तर खासदार कपिल पाटील यांनीही क्लस्टर योजना राबविण्याच्या सूचना अधिकाºयांना केल्या.नवी वस्तीमध्ये पालिकेच्या स्वच्छतागृहाच्या शेजारी पाच वर्षांपूर्वी वनविभागाच्या जागेवर ताहीरने चार मजल्यांची इमारत बांधली होती. या इमारतीत प्रत्येक मजल्यावर एक यानुसार चार कुटुंबे राहत होती, तसेच गच्चीवरही काही कुटुंबे राहत होती.तीन कुटुंबे बाहेर गेल्याने मोठी प्राणहानी टळली. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास इमारतीला अचानक भेगा पडून जोरदार आवाज होत ती कोसळली. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी, पोलीस तातडीने दाखल झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या ४० जवानांनी बचावकार्य सुरू केले. ढिगाºयाखालून सात जणांना बाहेर काढले. मात्र, ढिगाºयाखाली अद्याप काही जण अडकल्याची माहिती नागरिकांनी दिली. याच इमारतीत राहणारी परवीन खान अजून सापडली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना