भिवंडीत अग्नितांडवात पाच गोदामे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:38 IST2021-08-29T04:38:33+5:302021-08-29T04:38:33+5:30

भिवंडी : भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरूच असून तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीतील स्वराज्य कम्पाउंडमधील तयार कपडे, प्लास्टिक पाईप, कागदी ...

Five godowns burnt to ashes in Bhiwandi fire | भिवंडीत अग्नितांडवात पाच गोदामे जळून खाक

भिवंडीत अग्नितांडवात पाच गोदामे जळून खाक

भिवंडी : भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरूच असून तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीतील स्वराज्य कम्पाउंडमधील तयार कपडे, प्लास्टिक पाईप, कागदी पुठ्ठा साठविलेल्या गोदामास भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत पाच गोदामे जळून खाक झाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन तब्बल दहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निशमन दलाच्या प्रत्येकी एक गाडी घटनास्थळी दाखल असून खासगी टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. ही गोदामे भलीमोठी असल्याने आतमध्ये जाऊन आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणी येत होत्या. त्यातच गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने त्याचाही त्रास होत होता. अखेर दहा तासांनी आग आटोक्यात आली असून या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. सुदैवाने आग पहाटे लागल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Five godowns burnt to ashes in Bhiwandi fire