ठाण्यात प्रथमच ८ देशांचे बाप्पा
By Admin | Updated: September 21, 2015 14:43 IST2015-09-21T03:36:19+5:302015-09-21T14:43:41+5:30
ठाण्यात प्रथमच एकाच ठिकाणी स्थापलेल्या नऊ देशांमधील गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

ठाण्यात प्रथमच ८ देशांचे बाप्पा
ठाणे : ठाण्यात प्रथमच एकाच ठिकाणी स्थापलेल्या नऊ देशांमधील गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. घोडबंदर रोडवरील लोढा ग्रुप संकुलच्या ‘क्लब स्प्लेंडोर’ येथील गणेशोत्सवात भारताबरोबरच थायलंड, जपान, मेक्सिको, कंबोडिया, नेपाळ, चीन, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया आदी देशांच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.
‘लोढा फाउंडेशन’द्वारे या वेळी ठाण्यातील भाविकांसाठी गणेशोत्सव साजरा करताना ही एक वेगळी संकल्पना साकारली आहे. या संकल्पनेतून साकारलेल्या गणरायांचे स्वागत करून भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. भार्इंदरपाड्यात अवतरलेल्या वेगवेगळ्या देशांमधील या बाप्पाच्या दर्शनाचा अनेक भाविक लाभ घेत आहेत. या ठिकाणच्या प्रत्येक गणरायामध्ये त्या-त्या देशाचे प्रतिबिंब साकारल्याचे पाहायला मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. (प्रतिनिधी)