शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

डोंबिवली पश्चिमेला महिलांसाठी प्रथमच स्वतंत्र ई-टॉयलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 3:55 PM

येथिल रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होते. ही गंभीर अडचण लक्षात घेऊन पश्चिमेकडील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केवळ महिलांसाठी प्रथमच ई-टॉयलेटची सुविधा सुरू केली. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याचे लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्दे नगरसेविका मनीषा धात्रक यांची सुविधा नवजात शिशूंना स्तनपानासह चेंजिंग रूमची सुविधा

डोंबिवली: येथिल रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होते. ही गंभीर अडचण लक्षात घेऊन पश्चिमेकडील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केवळ महिलांसाठी प्रथमच ई-टॉयलेटची सुविधा सुरू केली.बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्या स्वच्छतागृहामध्ये नवजात शिशूंना स्तनपान करण्यासाठी जागा आहे. तसेच चेजिंग रूमची सोय आहे. यासह ३ शौचालय असल्याची माहिती धात्रक यांनी दिली. तसेच तेथे महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीनची सुविधा देखिल तेथे आहे. ५ रूपयामध्ये या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचे धात्रक म्हणाल्या. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मधल्या व कल्याण दिशेकडील पादचारी पूलानजीक ही सुविधा असून महिलांना सोयीचे होऊ शकेल अशी त्याची रचना आहे.रेल्वे स्थानकात अशी सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. स्थानकाच्या कल्याणसह मुंबई दिशेकडील प्रवेशद्वारांलगत स्वच्छतागृहाची सुविधा आहे, परंतू अशा प्रकारे महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आणि त्यात स्तनपान करण्यासह चेजिंग रूम, शौचालय आणि सॅनीटरी नॅपकीनची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाले आहे. शहरात एकमेव ठिकाणी ही सुविधा असल्याचे नगरसेवक शैलेश धात्रक यांनी आवर्जून सांगितले. यासंदर्भात अनेकांनी सूचना दिल्या होत्या, त्यानूसार सर्वसमावेशक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील होतो, या टॉयलेटच्या माध्यमातून त्याची काही अंशी पूर्तता झाल्याचा विश्वास नमिता किर, बबिता बोस, विजय कुलकर्णी, स्वप्नील पाटील, विजय बावीस्कर, केतन सिंघानिया, ज्ञानेश्वर पगारे आदींनी व्यक्त केला. नागरिकांनी स्वच्छता पाळावी, तसेच या सुविधेचा चांगला वापर करावा असे आवाहन धात्रक दाम्पत्याने केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीNarendra Modiनरेंद्र मोदी