नोकरीच्या पहिल्या दिवशी ‘तो’ रुग्णालयात
By Admin | Updated: June 28, 2017 03:18 IST2017-06-28T03:18:44+5:302017-06-28T03:18:44+5:30
मध्यप्रदेशातून विश्वनाथ यादव (३६) हा तरुण नोकरीनिमित्ताने मुंबईत आला होता. याचदरम्यान, नोकरीच्या पहिल्या दिवशी हजेरी लावण्यासाठी

नोकरीच्या पहिल्या दिवशी ‘तो’ रुग्णालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मध्यप्रदेशातून विश्वनाथ यादव (३६) हा तरुण नोकरीनिमित्ताने मुंबईत आला होता. याचदरम्यान, नोकरीच्या पहिल्या दिवशी हजेरी लावण्यासाठी आल्यावर तो ठाणे रेल्वे स्थानकात पडला. या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला अनोळखी म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तो काही दिवस आॅक्सिजनवर होता. नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. यात त्याच्यावर वेळीच योग्य उपचार झाल्याने स्वगृही रवाना झाला आहे.
सोमवारी १२ जून रोजी विश्वनाथला बेवारस रुग्ण म्हणून काही लोकांनी आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या वाचण्याची जणू शक्यताही डॉक्टरांनी सोडली होती. त्यातच ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी केम्पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रेखा गजलवार, डॉ.सचिन शिंदे हे त्याच्यावर उपचार करीत होते. सुरुवातीचे काही दिवस तो आॅक्सिजनवर होता. त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊन तो शुद्धीवर आल्याची माहिती परिचारिका शिला कचरे आणि कल्पना महाजन यांनी डॉक्टरांना दिली. विश्वनाथ बोलू लागल्यावर रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय पारखे, श्रीरंग सिद् यांनी त्याची विचारपूस केली. त्याची ओळख पटल्यावर तो भाऊ नागेंद्रप्रसाद यादव यांच्यासोबत मध्यप्रदेशात घरी जाण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पारखे व सिद यांनी दिली.