First All-Maratha Conference of Maratha Institutions to be held in Thane on August 8 | २५ ऑगस्टला ठाण्यात होणार देशभरातील मराठा संस्थांचे पहिले अखिल मराठा संमेलन  

२५ ऑगस्टला ठाण्यात होणार देशभरातील मराठा संस्थांचे पहिले अखिल मराठा संमेलन  

ठळक मुद्देठाण्यात होणार देशभरातील मराठा संस्थांचे पहिले अखिल मराठा संमेलन तरूण पिढीसाठी करीअर मार्गदर्शन शिबिरजमा होणारा निधी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 

ठाणे: देशभरातील १०० मराठा संस्थाच्या उपस्थितीत अखिल मराठा फेडरेशन  व मराठा मंडळ, ठाणे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील  पहिलेच अखिल मराठा संमेलन २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० ते रात्री १० वा पर्यंत राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह  ठाणे येथे संपन्नहोणार आहे. या संमेलनातील पहिल्या सत्रात विद्यार्थी, तरूण पिढीसाठी ठेवण्यात आलेले करीअर मार्गदर्शन शिबिर, हे या पिढीसाठी एक वेगळे आकर्षण असणार आहे.

                                          सैन्यदल, वायुदल, नौदल यामध्ये  युवा पिढीसाठीअसलेले उज्ज्वल भवितव्य सांगण्यासाठी जनरल विजयराव पवार या सत्रात येणार आहेत. उद्योगक्षेत्रात गरूडभरारी मारण्याची जिद्द मनात बाळगणाऱ्या युवा वर्गाला उद्योजक शिवाजीमहाराज या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक प्रा नामदेवराव जाधव मार्गदर्शन करतील. MPSC व UPSC या सरकारी नोकऱ्यांच्या दिशादर्शनासाठी MPSC बोर्डाचेमाजी अध्यक्ष मधुकरराव कोकाटे संमेलनातील विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात देशभरातून आलेल्या  १००च्यावर मराठा संस्थांचे वैचारिक अधिवेशन होईल. याअधिवेशनात समाजाच्या, संस्थाच्या आणि शासनाच्या प्रती ठराव मांडण्यात येतील. यातूनमराठा समाजाला संबंधितांकडून काय अपेक्षा आहे याची माहिती सर्वाना होईल. तिसऱ्या व अंतिम सत्रात गेली तीन वर्षे मराठा समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि कायदासुव्यवस्थेच्या कठोर अंमलबजावणी साठी झालेल्या ५८ क्राती मोर्चांना प्रतिसाद देऊनशासनाच्या आरक्षण समितीने केलेल्या सकारात्मक कामगिरीची पोचपावती त्याना देण्यात येईल. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांप्रती ते करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दलकृतज्ञता व्यक्त केली जाईल.  यात परगावच्या लाखो भक्तांच्या रहाण्याची व भोजनाची व्यवस्था करणारे अक्कलकोट येथील श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष.जन्मेंजयसिंह राजेभोसले, भारतीय सिनेसृष्टीत कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात अधिपत्य गाजवणारे जागतिक दर्जाचेकलादिग्दर्शक.नितीन देसाई, शिक्षणमहर्षी प्रा.. दशरथ सगर, अमृत डिस्टीलरीचे संस्थापक उद्योजक कै.निलकांतराव जगदाळे, कर्नाटक यांची प्रेरणादायी कामगिरी सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल, ज्या संस्था त्यांच्या विभागात उत्कृष्ट कार्य करीत आहेत त्यांचे कौतुक ही यावेळी करण्यातयेईल. याबरोबरीनेच समाजाला बौध्दिक खाद्य पुरविण्यासाठी नामवंत लेखकांचे साहित्य, प्रकाशने प्रदर्शन व विक्रीसाठी संमेलन स्थळी ‘साहित्य कट्टा’ या विभागात ठेवण्यात येईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमा होणारा निधी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. तसेच ज्या नवीन मराठा संस्थाना फेडरेशनमध्ये सामील व्हायचे आहे त्यांच्या साठी नोंदणीकक्षाची सुविधा असेल. अशा या भरगच्च, आगळ्या वेगळ्या मराठा अधिवेशन तथा समाज जागृती संमेलनाला ठाणेकर मराठ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन. राजेन्द्र साळवी,  सरचिटणीस, अखिल मराठा फेडरेशन आणि चिटणीस, मराठा मंडळ, ठाणे यांनी केले.

Web Title: First All-Maratha Conference of Maratha Institutions to be held in Thane on August 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.