महापोली परिसरात तरुणावर गोळीबार
By Admin | Updated: November 17, 2016 06:46 IST2016-11-17T06:46:22+5:302016-11-17T06:46:22+5:30
भिवंडी तालुक्यातील महापोली येथील तरूणावर गोळीबार झाल्याची घटना बुधवारी सकाळी नऊ वाजता घडली. उमेश गायकवाड (२९) असे जखमी

महापोली परिसरात तरुणावर गोळीबार
अंबाडी : भिवंडी तालुक्यातील महापोली येथील तरूणावर गोळीबार झाल्याची घटना बुधवारी सकाळी नऊ वाजता घडली. उमेश गायकवाड (२९) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
तो दुचाकीने भिवंडी येथे जात असताना भिवंडी - वाडा महामार्गावरील अनगाव येथे गाडीतून आलेल्या व्यक्तींनी उमेशवर गोळीबार केला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)