विरारमध्ये ज्वेलर्सच्या मालकावर गोळीबार
By Admin | Updated: October 1, 2015 23:30 IST2015-10-01T23:30:34+5:302015-10-01T23:30:34+5:30
विरार पोलीस ठाण्यांतर्गत साईनगर येथे दुचाकीवरून आलेल्या ३ मारेकऱ्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक किसन सिंग (२४) यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या

विरारमध्ये ज्वेलर्सच्या मालकावर गोळीबार
विरार : विरार पोलीस ठाण्यांतर्गत साईनगर येथे दुचाकीवरून आलेल्या ३ मारेकऱ्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक किसन सिंग (२४) यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यात सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांना संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारेकऱ्यांनी दागिन्यांची लूट केल्याचे सूत्रांनी सांगितले. ही घटना मंगळवारी घडली.
विशेष म्हणजे ज्या साईनगर भागात ही घटना घडली, त्या परिसरात दिवसरात्र बंदूकधारी पोलिसांचा खडा पहारा असतो. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मारेकऱ्यांविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरू आहे.