शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शहरातील फटाके विक्रेत्यांना यंदा कुठेही स्टॉल लावता येणार, कोपरीचे फटाके विक्रेतेही येणार अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 20:07 IST

  दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस फटकांचे स्टॉल लावणा-या तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांना यंदा मात्र शहरात कुठेही स्टॉल लावता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे :  दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस फटकांचे स्टॉल लावणा-या तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांना यंदा मात्र शहरात कुठेही स्टॉल लावता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने हा निर्णय घेतला असून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणीचे कारण त्यांनी पुढे केले आहे. त्यातही तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांबरोबरच जुन्या फटाके विक्रेत्यांना देखील यंदा ना हरकत प्रमाण देण्यात येणार नसल्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. त्यामुळे कोपरीत मागील कित्येक वर्षापासून होलसेल भावात फटक्यांची विक्री करणा-या दुकानदारांवर देखील यामुळे गडांतर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रस्त्यावर, फुटपाथवर कोणत्याही स्वरुपाची जिवीत अथवा वित्ता हानी होऊ नये म्हणून पालिकेने गेल्या काही वर्षापासून रस्त्यावर आणि फुटपाथवर फटाक्यांचे स्टॉल लावण्यास बंदी केली आहे. फटाक्यांचे स्टॉल लावायचे झाल्यास, ठाणो महापालिकेची मैदाने, मोकळे भुखंड आदी ठिकाणी अशा प्रकारे स्टॉल लावले जात आहेत. त्यानुसार मागील वर्षी तब्बल 250 च्या आसपास स्टॉल शहरात लागले होते. विशेष म्हणजे यासाठी आकारण्यात येणा:या भाडय़ातही पालिकेने मागील वर्षी वाढ केली होती. 

दरम्यान, मंगळवारी उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी फटाके विक्रीला बंदी घातल्याचे आदेश दिल्याने आता तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करणा:या फटाके विक्रेत्यांवर गडांतर आले आहे. दुसरीकडे ठाणो महापालिकेच्या अग्निशमन विभागाने बुधवारी याबाबत महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला असल्याचे समजते. परंतु दुसरीकडे आतार्पयत जे काही अर्ज अग्निशमन विभागाला प्राप्त झाले आहेत, त्यातील एकाही अर्जाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात असल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यातही पोलीस आणि परवाना विभागांना देखील याबाबत सुचना देण्यात आल्याची माहिती अग्निशमन सुत्रंनी दिली आहे.

तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतानाच गर्दीच्या ठिकाणी किंवा निवासी क्षेत्रत जर अशा पध्दतीने फटाक्यांची विक्री होत असेल तर त्यांना देखील ना हरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय देखील या विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका मागील कित्येक वर्षापासून कोपरी भागात फटाक्यांची विक्री करणा:या दुकानदारांना देखील बसणार असल्याची चित्र निर्माण झाले आहे. या ठिकाणी तर गोडावून असून तेथे फटाके डम्प केले जातात. सुरक्षितेतच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. असे काही मुद्दे मागील कित्येक वर्षापासून उपस्थित झाले असून त्यावर कारवाई करण्याची मागणी देखील वारंवार करण्यात आली आहे. परंतु असे असतांना देखील त्यावर कारवाई मात्र आजतागायत झालेली नाही. त्यामुळे अग्निशमन विभागाने या फटाके विक्रीच्या दुकानांबाबत कितपत लागू होतो हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.

 - अग्निशमन विभागाने ना हरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता पालिकेचा परवाना विभाग आणि पोलीसांकडून या विभागांना परवानगी देण्यात का? याबाबतचा निर्णय मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. 

टॅग्स :fire crackerफटाके