शिळफाट्यात आगीत ६ गोदामे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 05:36 IST2020-01-08T05:36:22+5:302020-01-08T05:36:31+5:30

मुंब्रा शिळफाटा येथील खान कम्पापाउंडमधील गोडाऊनला सोमवारी रात्री २ च्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये ६ गोदामे जळून खाक झाली आहेत.

Fireplace warehouse in warehouse | शिळफाट्यात आगीत ६ गोदामे खाक

शिळफाट्यात आगीत ६ गोदामे खाक

ठाणे/मुंब्रा : मुंब्रा शिळफाटा येथील खान कम्पापाउंडमधील गोडाऊनला सोमवारी रात्री २ च्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये ६ गोदामे जळून खाक झाली आहेत. प्लॅस्टिक, भंगार, चिंधी आणि पुठ्ठ्यांची ही सर्व गोदामे आहेत.
आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर त्वरित घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक दाखल झाले. २ ला लागलेली आग पहाटे ५ च्या सुमारास विझवण्यात आली. मात्र, कुलिंगची प्रक्रिया मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होती.
यामध्ये समशेर खान यांचे ५० बाय २० फुटांचे प्लॅस्टिक आणि भंगारचे गोदाम होते. अहमद अली यांचे ११ बाय ५० फुटांचे चिंध्यांचे तर मोहम्मद अक्र म शाह यांचे १५ बाय ५० फुटांचे बॅटचे गोदाम होते. शिवाय रफिक अहमद यांचे ९० बाय २० फुटांचे भंगाराचे दुकान होते तर गुलाब यांचे ५० बाय २० आणि ५० बाय १५ फुटांची अशी दोन गोदामे होती.
असुरक्षित वायरिंगमुळे आग
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र, या गोदामांमध्ये वीज घेण्यासाठी वायर असुरक्षित पद्धतीने घेतल्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीची नोंद डायघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Fireplace warehouse in warehouse