शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात वाहनांना आग; चार वाहने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:15 IST

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालया च्या आवारात उभ्या असलेल्या चार वाहनांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये चारही वाहने जळून खाक झाली आहेत. यात तीन रुग्णवाहिका आणि एका जीपचा समावेश असून आगीचे कारण मात्र अद्याप कळले नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. त्यामुळे ही आग लागली की ...

ठळक मुद्देआगीचे कारण अज्ञातआग लागली की लावली? प्रश्न केला जातोय उपस्थित

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या चार वाहनांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये चारही वाहने जळून खाक झाली आहेत. यात तीन रुग्णवाहिका आणि एका जीपचा समावेश असून आगीचे कारण मात्र अद्याप कळले नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. त्यामुळे ही आग लागली की लावली, याबाबत प्रश्न उपस्थित होतो आहे. बाळचोरीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात लागलेल्या आगीने पुन्हा एकदा रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे.जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील अपघात विभागाच्या इमारतीलगत असलेल्या मोकळ्या जागेत भंगार झालेली वाहने एकमेकांना खेटून उभी केलेली आहेत. शासकीय वाहने असल्याने ही वाहने कित्येक दिवसांपासून रुग्णालयाच्या आवारातच आहेत. याच वाहनांना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्र रूप धारण केल्याने ही चारही वाहने जळाली. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी तातडीने धाव घेत अवघ्या १५ ते २० मिनिटांत आग आटोक्यात आणली. या वेळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.‘‘घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेऊन पहिली आग आटोक्यात आणली. यामध्ये चार वाहने जळाली असून ही आग कशामुळे लागली, हे मात्र समजू शकले नाही. जळालेली वाहनेही भंगारात काढलेली होती.’’ - संतोष कदम, ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख‘‘भंगारात काढलेल्या जुन्या वाहनांना आग लागली आहे. उंदरांनी वायर कुरतडल्याने बहुधा शॉर्टसर्किट झाले असावे. त्यामुळे ही आग लागली असावी.’’ - डॉ. बी.सी. केम्पीपाटील, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हील हॉस्पिटलआगीमुळे भीतीचे वातावरणदुपारची वेळ असल्याने रुग्ण विश्रांती घेत होते. त्यातच, रविवार असल्याने रुग्णालय आवारात शांतता होती. आग लागल्याने रुग्णालय आवारात गोंधळ उडाला आणि क्षणार्धात रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यातच, अग्निशमन दलाच्या एकामागून एक अशा चार गाड्या घंटा वाजवत रुग्णालयाच्या मुख्य गेटमधून आत शिरल्याने रुग्णालयात काय झाले, हे पाहण्यासाठी लोकांनीदेखील एकच गर्दी केली.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलFairजत्रा