भूमिगत गटारातील कचऱ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:15 IST2021-02-21T05:15:37+5:302021-02-21T05:15:37+5:30

ठाणे : माजिवडा उड्डाणपुलाखाली असलेल्या भूमिगत गटारातील कचऱ्याला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती ...

Fire underground sewer waste | भूमिगत गटारातील कचऱ्याला आग

भूमिगत गटारातील कचऱ्याला आग

ठाणे : माजिवडा उड्डाणपुलाखाली असलेल्या भूमिगत गटारातील कचऱ्याला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने धाव घेऊन ही आग तत्काळ आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे दिसून आले.

(फोटो ठाणे फायर)

----------------------------------------------------

भाजप आर्थिक प्रकोष्ठ अध्यक्षपदी विनोद टिकमानी

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे शहर जिल्हा भाजपच्या आर्थिक प्रकोष्ठ अध्यक्षपदी सी. ए. विनोद लक्ष्मण टिकमानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक प्रकोष्ठमध्ये टिकमानी यांच्याबरोबरच पाच उपाध्यक्ष, १० सचिव आणि १५ कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत सी. ए. विनोद टिकमानी यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी माजी नगरसेवक लक्ष्मण टिकमानी, भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विकी टिकमानी यांची उपस्थिती होती.

(फोटो - ठाणे टिकमानी )

.......

Web Title: Fire underground sewer waste