शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

फायर एनओसीसाठी हॉटेल व्यावसायिकांची दमछाक, उपाययोजनांचे सत्यप्रतिज्ञा सादर करण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 5:44 AM

फायर सेफ्टी नॉर्मस्चे उल्लंघन करणा-या शहरातील ४५८ हॉटेल व्यावसायिकांना त्यांची पूर्तता करण्यासाठी ठाणे महापालिकेने १५ दिवसांची मुदतवाढ दिली असली तरी त्यासाठी अग्शिनमन विभागाने जो नवा अर्ज तयार केला आहे, त्यातील अटी व शर्तींची पूर्तता करतांना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

- अजित मांडकेठाणे : फायर सेफ्टी नॉर्मस्चे उल्लंघन करणा-या शहरातील ४५८ हॉटेल व्यावसायिकांना त्यांची पूर्तता करण्यासाठी ठाणे महापालिकेने १५ दिवसांची मुदतवाढ दिली असली तरी त्यासाठी अग्शिनमन विभागाने जो नवा अर्ज तयार केला आहे, त्यातील अटी व शर्तींची पूर्तता करतांना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.या अटी व शर्तींमध्ये फायर सेफ्टी, मार्गिका, जनरेटर, आग विझविण्याचे साहित्य, आत आणि बाहेर येजा करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका यासह इतर काही महत्त्वाच्या अटींचा त्यात समावेश असल्याने त्यांची पूर्तता करतांना हॉटेल व्यवसायिकांची तारेवरची कसरत होत आहे. यामुळे आतापर्यंत २५० अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.मुंबईत घडलेल्या आगीच्या घटनेनंतर ठाणे शहरातील ज्या ५०० चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली हॉटेल्स, लाऊंज बार, हुक्का पार्लर्सनी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला सादर केलेला नाही अथवा महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या तरतुदींचे पालन केलेले नाही अशा सर्व आस्थापनांना महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधित आस्थापनांना ३० डिसेंबर, २०१७ रोजी ७२ तासांत आपली कागदपत्रे सादर करण्याची नोटिस देण्यात आली होती. परंतु, ती दिल्यानंतरही ज्या आस्थापनांनी अधिनियमातील तरतुदींची पूर्तता न केल्याने आयुक्तांनी या आस्थापना सील करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर झोपी गेलेले हॉटेल व्यावसायिक खडबडून जागे झाले असून त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन ही १५ दिवसांची मुदतवाढ मिळवली आहे. त्यानुसार अवघ्या दोनच दिवसात तब्बल २५० अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.या अर्जात १९ प्रश्न केले असून त्यांचे उत्तर हॉटेल व्यावसायिकाला होय किंवा नाही या स्वरुपात भरावयाचे आहे. परंतु, हे प्रश्न अतिशय किचकट किंबहुना ठाण्यातील काही हॉटेलच्या परिस्थिती पाहिल्यास त्यांना त्यामुळे फायर एनओसी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. विद्युत जोडणी ही अद्यवयात भारतीय मानकानुसार असावी, असे यात प्रामुख्याने नमूद केले आहे. हॉटेलपर्यंत फायर वाहन जाण्याकरीता रस्ता उपलब्ध, आत आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गिका, स्वयंकापगृहासाठीदेखील दोन मार्गिका आणि सर्व पॅसेजेस अडथळा विरहित ठेवण्यात यावे, आत येण्याच्या मार्गिकेपासून मागील बाजूस जाण्याकरीता किमान एक मीटर रुंदीचा पॅसेज अडथळा विरहित ठेवावा, उपहारगृहात अग्निरोधक रंग लावण्याचे बंधन तसेच उपहारगृहातील पडदे तसेच सर्व फर्निचर हे अग्निरोधक मटेरीअलचा वापर करणे, विद्युत वायरिंगच्या क्षेत्रात एक मीटर अंतरापर्यंत कोणत्याही ज्वलनशील वस्तुंचा साठा करण्यात येऊ नये, पोटमाळा नसावा, स्वयंपाकगृहातील चिमणी इमारतीच्या गच्चीच्या २ मीटरच्या वर बसविण्यात यावी, बाहेर पडण्याचे मार्ग रेडीअमने मार्क केलेले असावेत अशा काही अटी टाकल्या आहेत. परंतु महत्त्वाच्या अटींची पूर्तता करतांना त्यांना तारवरेची कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.प्रतिज्ञापत्रानंतरहीहोणार शहानिशाहॉटेल व्यवसायिकांनी हा अर्ज भरल्यानंतर तशा आशयाचे सत्यप्रतिज्ञा पत्रही सात दिवसात सादर करायचे आहे. त्यानंतर अग्निशमन विभागाचे अधिकारी अर्जात भरलेली माहिती खरी आहे किंवा खोटी याची शहनिशा प्रत्यक्ष पाहणी करून करणार आहेत.अनधिकृत हॉटेलहोणार अधिकृतया प्रक्रियेत सदरची आस्थापना अधिकृत अथवा अनधिकृत आहे, याची माहितीदेखील घेतली जाणार आहे. परंतु, अनाधिकृत अस्थापना असेल तर त्यांना महापालिकेच्या नव्या ठरावानुसार कंपोनंट चार्जेस भरून ती अ धिकृत करता येणार आहे. त्यामुळे पूर्वी जी हॉटेल अनधिकृतपणे सुरू होती, ती आता अधिकृत होणार आहेत.फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया अगदी सुलभ करण्यात आली आहे. तसेच सत्यप्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर, आमच्या विभागाचे अधिकारी देखील क्रॉस चेकींग करणार आहेत. त्यानुसार अर्जात देण्यात आलेली माहिती चुकीची आढळल्यास एनओसी नाकारली जाणार आहे.- शशीकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपा

टॅग्स :thaneठाणे