कल्याणच्या एनआयआयटी संस्थेमध्ये आग
By Admin | Updated: March 27, 2017 05:39 IST2017-03-27T05:39:29+5:302017-03-27T05:39:29+5:30
पश्चिमेकडील रेल्वे स्थानक रस्त्यावरील एनआयआयटी संस्थेत रविवारी आग लागली. दुपारी दीडच्या सुमारास ही

कल्याणच्या एनआयआयटी संस्थेमध्ये आग
कल्याण : पश्चिमेकडील रेल्वे स्थानक रस्त्यावरील एनआयआयटी संस्थेत रविवारी आग लागली. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. आगीमुळे संपूर्ण मजला जळून खाक झाल्याने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. मात्र, रविवारी सुटी असल्यामुळे विद्यार्थी नव्हते. शिक्षक आणि कर्मचारी असे ५ ते ६ जण उपस्थित होते. दरम्यान, सर्किटरूममध्ये आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने सुरक्षितस्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. (प्रतिनिधी)