ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यांना लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 07:48 AM2018-01-17T07:48:07+5:302018-01-17T07:54:12+5:30

ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लोकलच्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी (17 जानेवारी) पहाटेच्या सुमाराची ही घटना आहे.

Fire in local coaches on Thane railway station | ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यांना लागली आग

ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यांना लागली आग

Next
ठळक मुद्देठाणे स्थानकात लोकलच्या डब्यात अग्नितांडवदुर्घटनेत एक डबा पूर्णतः जळून खाकसुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

ठाणे - मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लोकलच्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी (17 जानेवारी) पहाटेच्या सुमाराची ही घटना आहे. अग्निशमन दलाला भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत लोकलचा एक डबा पूर्णतः जळून खाक झाला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरुन आलेल्या 12 डब्यांच्या लोकलमधील डबा क्रमांक 2010 बी मोटर कोचला भीषण आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळल्यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाची 4 फायर वाहने, 2 वॉटर टँकर, 1 रेस्क्यू वाहन तातडीनं दाखल झाले होते. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आली आहे.  

Web Title: Fire in local coaches on Thane railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.