अग्निशमनचा प्रश्न अधिवेशनात
By Admin | Updated: March 25, 2017 01:18 IST2017-03-25T01:18:29+5:302017-03-25T01:18:29+5:30
भिवंडीतील गोदामपट्टयातील ग्रामपंचायतीमध्ये अग्निशमन दलाची व्यवस्था करण्यासाठी अधिवेशनात प्रश्न मांडणार असून मुख्यमंत्र्यांना

अग्निशमनचा प्रश्न अधिवेशनात
रोहिदास पाटील / अनगाव
भिवंडीतील गोदामपट्टयातील ग्रामपंचायतीमध्ये अग्निशमन दलाची व्यवस्था करण्यासाठी अधिवेशनात प्रश्न मांडणार असून मुख्यमंत्र्यांना पत्रही देणार असल्याची माहिती आमदार शांताराम मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘ग्रामपंचायतीकडे अग्निशमन यंत्रणेचा अभाव’ असे वृत्त ‘लोकमत’च्या बुधवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल आमदारांनी घेतली आहे.
भिवंडी तालुका पोलिसांनी गोदाममालक, संरपंचांची बैठक घेऊन अग्निशमन यंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशा सूचना केल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी दिली.
औद्योगिकदृष्ट्या तसेच दिवसेंदिवस गोदामांची संख्या वाढत आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामपंचायतींकडे अद्यापही अग्निशमन व्यवस्था नाही. त्यामुळे ती व्यवस्था करण्यात यावी याकरिता लवकरच पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊ अशी माहिती शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी दिली. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनीही या वृत्ताचे स्वागत केले आहे.