शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

शहर विकास विभागात लागली आग, स्फोटक फाईल्स भस्मसात करण्याचा आटापीटा, नारायण पवार यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 16:54 IST

ठाणे महापालिकेच्या चवथ्या मजल्यावरील शहर विकास विभागात मंगळवारी शॉकसर्कीटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र आता यावरुन भाजपने मोठा आरोप केला आहे. स्फोटक फाईल्स भस्मसात करण्याासाठीच हा आटापीटा सुरु असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या चवथ्या मजल्यावरील शहर विकास विभागात मंगळवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. परंतु येथील सुरक्षा रक्षकांनी ही आग विझवली. शॉकसर्कीटमुळे ही आग लागली असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु स्फोटक फाईल्स भस्मसात करण्यासाठीच हा आटापिटा सुरू असल्याचा आरोप करीत भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी सुमारे साडेपाच वर्षांच्या फाईल्स सीआयडीने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.       शहर विकास विभागात मंगळवारी पहाटे शॉकसर्कीटने लागलेल्या आगीत काही एक संगणक व एलईडी टीव्ही जळून खाक झाला आहे. परंतु यात काही महत्वाच्या फाईल देखील जळाल्या असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे. या संदर्भात अद्याप पालिकेकडून काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. यापूर्वी २६ फेब्रुवारी रोजी नगरसेवक नारायण पवार यांनी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र पाठवून शहर विकास विभागाला आग लावण्याचा संशय व्यक्त केला होता. शहर विकास विभागाने काही वर्षांपासून हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानुसार वादग्रस्त बिल्डरांना सीसी, पार्ट ओसी, जोता प्रमाणपत्र, ओसी आणि टीडीआर देण्यात आल्याची अनेक कागदपत्रे आहेत. त्यातील काही संशयास्पद प्रस्तावांबाबत अनेक तक्र ारीही लाचलुचपत विभाग, मंत्रालय आणि सीआयडीकडे दाखल आहेत. त्याबाबत चौकशी सुरू आहे. तर काही व्यवहारांसंदर्भात उच्च न्यायालयाकडे जनहित याचिकाही (पीआयएल) दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व फाईल्सचा स्फोटक साठा सध्या शहर विकास विभागात आहे, याकडे नारायण पवार यांनी आयु्क्तांचे लक्ष वेधले होते. संभाव्य आगीपासून संरक्षण होण्यासाठी विभागातील इलेक्ट्रीक व्यवस्था, अग्निशमक उपकरणे आदींसह पर्यायी व्यवस्थेची तपासणी करण्याचीही विनंती नारायण पवार यांनी केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नव्हती.काल रात्री लागलेल्या छोट्या आगीने माझी भीती दुर्देवाने खरी ठरत आहे. संगणकाला आग लावल्यानंतर संपूर्ण शहर विकास विभाग खाक करण्याचा डाव फसला असावा, असा संशय व्यक्त करून नगरसेवक नारायण पवार यांनी तत्काळ सीआयडीने शहर विकास विभागातील गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीतील सर्व फाईल्स ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी वेळीच पावले न उचलल्यास, कोट्यवधींचा भ्रष्टाचार गडप केला जाईल, अशी भीतीही व्यक्त केली....त्या संगणकात नक्कीहोते काय? - नारायण पवारशहर विकास विभागातील आगीत काही संगणक जळाले आहेत. या संगणकात नक्की काय होते? त्याची सर्व्हरमध्ये नोंद झाली आहे का? याची चौकशी करण्याची गरज आहे. या विभागात एखाद्या विकास प्रस्तावाची (व्हीपी) संपूर्ण फाईल नक्की कधी सापडतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या आगप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाfireआग