शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

ठाण्यातील हॉटेलला आग, मोठं नुकसान; अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 10:09 IST

ठाणे अग्निशमन दलाचे मदतकार्य: हॉटेलचे मोठया प्रमाणात नुकसान

जितेंद्र कालेकर

ठाणे: घोडबंदर रोड येथील वाघबीळ नाक्यावरील श्री साई प्युअर व्हेज हॉटेललाआग लागल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. या घटनेत हॉटेलच्या पोटमाळयावर अडकलेल्या दीपक दास (३०) याच्यासह तिघांची सुटका करण्यात ठाणे अग्निशमदन दल आणि आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले. हे तिघेही किरकोळ जखमी झाले असून आग आटोक्यात आल्याची माहिती  अग्निशमन दलाने दिली. 

वाघबीळ येथे हरीश सालियन यांच्या  मालकीचे तळ अधिक एक मजली इमारतीमध्ये हे श्री साई प्युअर व्हेज हॉटेल आहे. बुधवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास या हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती बाळकुम अग्निशमन दलाला मिळाली. त्याच आधारे घटनास्थळी कासारवडवली पोलिस कर्मचाºयांसह महावितरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अग्निशमन दलाचे जवान दोन फायर वाहन , दोन रेस्क्यू वाहन आणि एका जम्बो वॉटर टँकरसह दाखल झाले. या हॉटेलमधील स्वयंपाकगृहाची आग अचानक वरील मजल्यावर गेल्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. यावेळी हॉटेलमध्ये सहा कर्मचारी होते. त्यातील तिघांनी लगेचच हॉटेलबाहेर धाव घेतली. तर उर्वरित तिघे हे पोटमाळयावर झोपलेले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी यातील दीपक दास याच्यासह अमर देसाई (२८ ) आणि महेश मोकल (२९ )  अशा तिघांची सुटका केली. यात महेशच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून दीपकच्या हाताला आणि महेशच्या चेहºयाला किरकोळ दुखापत झाली आहे. या हॉटेलमधून सात व्यावसायिक भारत गॅस सिलेंडर आणि एक डोमेस्टिक भारत गॅस सिलेंडर बाहेर काढून अग्निशमन दलाच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाºयांनी अर्ध्या तासाच्या अंतराने ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली. मात्र, या आगीमध्ये हॉटेलचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेhotelहॉटेलfireआगFire Brigadeअग्निशमन दल