गुप्तहेर तिवारीचे आरोपींसोबत आर्थिक व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:52 IST2018-05-19T05:52:34+5:302018-05-19T05:52:34+5:30
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणी ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीसह दिल्लीचा गुप्तहेर तिवारीचे आर्थिक संबंध उघडकीस आले आहेत.

गुप्तहेर तिवारीचे आरोपींसोबत आर्थिक व्यवहार
ठाणे : बेकायदेशीर सीडीआर प्रकरणी ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीसह दिल्लीचा गुप्तहेर तिवारीचे आर्थिक संबंध उघडकीस आले आहेत. न्यायालयाने शुक्रवारी त्याला २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने गुरुवारी दिल्ली येथील खासगी गुप्तहेर पंकज तिवारी याला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी पूर्वी अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून तिवारीचा सहभाग उघडकीस आला. तिवारीने या आरोपीला काही सीडीआर पुरविले होते. त्याच्या मोबदल्यात त्याने आरोपीकडून काही रक्कम उकळली. या आर्थिक व्यवहाराचे पुरावे पोलिसांना मिळाले. हा तपशील पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयासमोर मांडून तिवारीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने २४ मेपर्यंत त्याची पोलीस कोठडी सुनावली.