जलद लोकलमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:51 AM2020-08-12T00:51:42+5:302020-08-12T00:52:03+5:30

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी; धिमी लोकल सोडण्याची मागणी

Financial hardship to passengers due to fast local | जलद लोकलमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

जलद लोकलमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

Next

ठाणे : उपनगरी लोकल सध्या फास्ट ट्रॅकवरच धावत आहेत. त्यामुळे काही स्टेशनवर उतरणाºया प्रवाशांना पुढील दोन ते तीन स्टेशनपर्यंत जावे लागते. त्यानंतर पुन्हा मागे येण्यासाठी या कर्मचारी, अत्यावश्यक सेवेच्या प्रवाशांना रिक्षाभाड्याचा मनमानी आर्थिक भुर्दंडाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, त्यांनी धीमी लोकलची मागणी केली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहे. मात्र, त्या जलद ट्रॅकवरून धावत असल्यामुळे कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली स्टेशनवर त्या थांबत नाहीत. त्यामुळे तेथे राहणाºया कर्मचाºयांना एक ते दोन स्टेशन पुढे उतरावे लागत आहे. यासारखी गंभीर स्थिती कसारा, बदलापूरकडे जाणाºया प्रवाशांना सहन करावी लागत आहे. विठ्ठलवाडी, उल्हासनगर या स्टेशनवरही लोकल थांबत नाहीत. याप्रमाणेच शहाडसह त्यापुढील स्टेशनलाही न थांबता थेट टिटवाळा स्टेशनवर लोकल थांबत आहे. त्यामुळे कर्मचाºयांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत कर्मचारी रिक्षाभाड्याच्या रोजच्या रोख रकमेच्या समस्येमुळे तीव्र नाराज आहे. या प्रवाशांत अत्यावश्यक सेवेतील काही कंत्राटी कर्मचारी आहेत तर काही कर्मचारी आधीच कर्जाने जर्जर झालेले आहेत.

सावकारांकडून कर्जाच्या हप्त्याची वसुली
कोरोनामुळे अनेकांना पूर्ण वेतनही मिळत नाही. जे मिळते ते वेतनही घरापर्यंत काही कर्मचाºयांना नेता येत नाही. वेतन घेताच बाजूला उभे असलेले सावकार ते कर्जाच्या हप्त्यापोटी घेऊन टाकत असल्याचे त्रस्त कर्मचाºयांनी सांगितले. त्यातच महिन्याचे पूर्ण दिवस भरण्यासाठी या कर्मचारी वर्गास रोजच्या रिक्षाभाड्याच्या रोख रकमेला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ते नाराज आहेत.

Web Title: Financial hardship to passengers due to fast local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.