Financial discipline must be followed in the functioning of the Government - The Collector | शासकीय कामकाजामध्ये आर्थिक शिस्तीचे पालन करणे आवश्यक - जिल्हाधिकारी

सह संचालक व कोकण विभाग कोषागारे यांच्याव्दारे ‘कोकण विभागातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची एक दिवशीय कार्यशाळा गुरूवारी पार पडली

ठळक मुद्दे‘कोकण विभागातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची एक दिवशीय कार्यशाळाठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील २५० आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित काम केले तर सर्व देयकांचा वेळेत व जलद गतीने निपटारा करणे सहज शक्य

ठाणे : शासकीय कामकाजामध्ये वित्त विषयक सर्व बाबी गांभीर्याने हाताळण्याबरोबरच त्यांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देण्यात यावा, तसेच या बाबी हाताळताना आर्थिक शिस्तीचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.
       येथील नियोजन भवनमध्ये ‘प्रलंबित संक्षिप्त देयके व उपयोगिता प्रमाणपत्र’ या विषयी लेखा विभागाचे सह संचालक व कोकण विभाग कोषागारे यांच्याव्दारे ‘कोकण विभागातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची एक दिवशीय कार्यशाळा गुरूवारी पार पडली. दोन सत्रात पार पडलेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. शासकीय कामकाज करतांना वित्त विषया बाबत सर्वजण अतिशय जागरूक असतात. तरी कालमर्यादा किवा अन्य काही बाबींमुळे संक्षिप्त देयके व उपयोगिता प्रमाणपत्रांचा वेळेत निपटारा होत नाही. सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी प्रलंबित संक्षिप्त देयकांचा व उपयोगीता प्रमाणपत्रांचा वेळेत निपटारा करणे आवश्यक असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी वरिष्ठ उप महालेखापाल एस. एस सरफरे, सहसंचालक लेखा व कोषागारे सिताराम काळे, जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर, सहायक लेखाधिकारी ललिता नारायणस्वामी, सहायक संचालक संजय गोरे आदी उपस्थित होते.
         प्रलंबित संक्षिप्त देयक, उपयोगिता प्रमाणपत्र या अनुषंगाने प्रत्येक आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन वरिष्ठ उप महालेखापाल सरफरे यांनी केले. एखाद्या ठिकाणी बदली झाल्यानंतर उद्या परत बदली होणार आहे, हा दृष्टीकोन ठेवून काम केले तर सर्व देयकांचा वेळेत व जलद गतीने निपटारा करणे सहज शक्य आहे. अनेकदा वेळेवर सादर न केलेली देयके प्रलंबित राहतात आणि नंतर ती संख्या वाढत जाते. तसेच उशीर झाल्याने देयकांचा चा वेळेत निपटारा होत नाही. त्याचे लेखा विषयक प्रतिकूल परिणाम होतात. विहित मुदतीत तपशीलवार देयके सादर करण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाने ठेवला तर कुठल्याही प्रकारची देयके प्रलंबित राहणार नाहीत असे ही त्यांनी सांगितले. यावेळी सहसंचालक काळे यांनी उपस्थिताना सखोल मार्गदर्शन केले.
         या कार्यशाळेच्या दुसऱ्यां सत्रात सहायक लेखाधिकारी नारायणस्वामी यांनी पावर पोइंट प्रेझेन्टेशनसह सविस्तर मार्गदर्शन केले. देयके सादर करतांना घ्यावयाची काळजी आदीं विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील २५० आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून संबधित सर्व घटकांचा महालेखापाल कार्यालयाशी थेट संवाद करण्यासह जागरु कता निर्माण होवून प्रलंबित संक्षिप्त देयके व उपयोगिता प्रमाणपत्रांचा निपटारा जलद गतीने होण्यास चालना मिळणार असल्याची अपेक्षा यावेळी उपस्थित व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
 

Web Title: Financial discipline must be followed in the functioning of the Government - The Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.