शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदलीच्या ठिकाणी मंगळवारपासून हजर व्हा!, कोकण आयुक्तांचे शिक्षकांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 01:49 IST

कोकणातील ठाणे जिल्हा परिषदेसह पालघर, रायगड, रत्नागिरी अणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.

- सुरेश लोखंडे  ठाणे  -  कोकणातील ठाणे जिल्हा परिषदेसह पालघर, रायगड, रत्नागिरी अणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. आॅनलाइन झालेल्या या बदल्यांनंतर नवीन शाळेवर हजर होण्याचे आदेशही संबंधित शिक्षकांना प्राप्त झाले. मात्र, आचारसंहितेमुळे ते रखडले होते. तरीदेखील, १२ मे च्या सुटीच्या आधी या शिक्षकांनी त्यांच्या नवीन शाळेवर हजर होण्याचे आदेश गुरुवारी कोकणभवनला झालेल्या बैठकीत कोकण विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार, त्यांना ६ मे पासून सध्याच्या शाळेतून कार्यमुक्त करून ७ मे ला बदली झालेल्या शाळेवर हजर होण्यास सांगितले आहे.ठाणे जिल्ह्यातील दोन हजार ११९ शिक्षकांसह कोकणातील उर्वरित चार जिल्हा परिषदांच्या हजारो शिक्षकांच्या सुमारे दीड महिन्यापूर्वी आॅनलाइन बदल्या झाल्या आहेत. त्यांचे आदेशही संबंधित शिक्षकांना मिळालेले आहेत.महाराष्टÑ दिनानंतर म्हणजे २ मे पासून या शिक्षकांना नवीन शाळेवर हजर होण्याचे आदेश होते. या शैक्षणिक वर्षातच बदली झालेल्या शाळेवर या शिक्षकांना हजर व्हावे लागणार होते. तसे आदेशही शिक्षकांना मिळालेले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या आदेशाला स्थगिती मिळाली होती. परंतु, आता कोकणातील या जिल्ह्यांमधील लोकसभेच्या निवडणुका चौथ्या टप्प्यात नुकत्याच पार पडल्या आहेत. यामुळे २३ मे च्या मतमोजणीनंतर शिक्षकांना शाळांवर हजर व्हावे लागणार होते. पण, आता शाळांना १२ मे रोजी सुटी लागण्याच्या आधी या बदली झालेल्या शिक्षकांना ७ मे रोजी हजर होण्यास सांगण्यात आले आहे.जिल्ह्यांतर्गत बदलीप्रक्रिया आचारसंहितेमुळे तात्पुरती थांबवण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सं.ना. भंडारकर यांनी २२ मार्च रोजी जारी केले होते. त्यातून, कोकणातील शिक्षकांना मात्र वगळले होते.यास अनुसरून ‘राज्यातील शिक्षकांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित; ठाण्यासह कोकणातील शिक्षक बदल्या जैसे थे’ या मथळ्याखाली लोकमतने २४ मार्चला वृत्त प्रसिद्ध करून हा विषय उघड केला होता. या वृत्ताची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बदली झालेल्या शिक्षकांना आचारसंहिता संपेपर्यंत कार्यमुक्त करू नये, असे आदेश ३० मार्च रोजी जारी केले होते. यामध्ये कोकणातील चार जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांसह ठाणे जिल्ह्याच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांचादेखील समावेश होता.नवीन शाळेवर हजर होण्याची लगबगकोकण विभागीय आयुक्तालयाच्या कार्यालयात गुरुवारी बैठक झाली असता या शिक्षकांनी ७ मे पासूनच त्यांच्या नवीन शाळेवर हजर होण्याच्या मुद्यावर चर्चा झाली.त्यानंतर, तातडीने तसे आदेशही पारित करण्यात आले. यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच नवीन शाळेवर हजर होऊन नंतर सुटीचा आस्वाद घेण्याची लगबग शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीthaneठाणे