शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अखेर जोशी रुग्णालयाच्या हस्तांतराचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:51 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या कराराला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नुकतीच अंतिम मान्यता दिली आहे.

भार्इंदर :मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या कराराला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नुकतीच अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रुग्णालय हस्तांतरणाचा तिढा अखेर सुटल्याने पालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.पालिकेने २०१२ मध्ये बांधलेले हे सर्वसाधारण रुग्णालय राज्य सरकारमार्फत चालवण्याचा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर करण्यात आला होता. परंतु, त्याचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाने हस्तांतरणाला परवानगी नाकारून ते रुग्णालय पालिकेनेच चालवावे, असा आदेश दिला. त्यामुळे आजपर्यंत हे रुग्णालय पालिकेकडून चालवले जात असले, तरी ते राज्य सरकारकडेच हस्तांतरित व्हावे, यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पाठपुरावा सुरू होता. त्याची दखल घेत राज्याचे महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी १० जानेवारी २०१६ रोजी रुग्णालय लोकार्पण सोहळ्यात हे रुग्णालय लवकरच सरकारकडे हस्तांतरित करण्याचे आश्वासन दिले होते.त्यात, अनेकदा तांत्रिक अडचणी आल्यानंतर अखेर ३० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत रुग्णालय हस्तांतरणाला मान्यता देण्यात आली. रुग्णालय हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते, पालिका उपायुक्त (आरोग्य विभाग) डॉ. संभाजी पानपट्टे आणि उपसंचालक (आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे), डॉ. रत्ना रावखंडे यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्यासाठी मे २०१७ पर्यंतची मुदत देण्यात आली. परंतु, तांत्रिक अडचणीत सापडलेल्या या रुग्णालयाचे हस्तांतरण रखडले. त्यातच रुग्णालयातील रुग्णसेवा पुरेशी नसल्याचा खटला न्यायप्रविष्ट करण्यात आल्याने हस्तांतरणाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु, आरोग्य संचालकांमार्फत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होताच पालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालय हस्तांतरणाचा करारनामा ९ आॅगस्ट रोजी राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला. अखेर, त्याला काही किरकोळ दुरुस्तीनंतर ३१ आॅक्टोबरला अंतिम मान्यता देण्यात आली. त्याचे पत्र पालिकेला दोन दिवसांपूर्वीच प्राप्त झाले. या रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा तिढा सुटल्याची प्रतिक्रिया प्रशासकीय अधिकाºयांकडून व्यक्त होऊ लागली आहे.रुग्णालय हस्तांतरणासाठी पालिकेला आरोग्य उपसंचालकांसोबत अंतिम सामंजस्य करार करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार असून त्यानंतरच रुग्णालयाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेचा शेवट होणार आहे. हस्तांतरणानंतर मात्र त्यातील कर्मचारी व अधिकाºयांना पालिकेकडून पुढील वर्षभरासाठीचे वेतन दिले जाणार आहे. तसेच पालिकेच्या नावे असलेला रुग्णालय जागेचा सातबारा व मालमत्तापत्र पालिकेला राज्य सरकारच्या नावे करावे लागणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल