शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

अखेर टीएमटीच्या तेजस्विनीला मिळणार १२५ कंत्राटी महिला वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 10:52 PM

टीएमटी अर्थात ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसमध्ये वाहक (कंडक्टर) मात्र पुरुषच होते. आगामी आर्थिक वर्षामध्ये तीन कोटी २२ लाखांची तरतूदीतून १२५ कंत्राटी महिला वाहकांची नेमणूक करण्यात येणार असल्यामुळे महिला प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.

ठळक मुद्दे १८ आसनी मिनी पोस्ट बस खरेदी करणारवाहतूककोंडीवर उतारा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ताफ्यात खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसमध्ये वाहक (कंडक्टर) मात्र पुरुषच होते. त्यावर महिला प्रवाशांची नाराजी होती. त्यासाठी आगामी आर्थिक वर्षामध्ये १२५ कंत्राटी महिला वाहकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तीन कोटी २२ लक्ष रकमेची तरतूद केली आहे.ठाणे परिवहन उपक्र माच्या वागळे आगारामधील कै. मिनाताई ठाकरे सभागृहामध्ये मंगळवारी अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेमध्ये परिवहनचे व्यवस्थापक संदिप माळवी यांनी प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांच्याकडे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ४३८ कोटी ८६लाख रु पयांचा अर्थसंकल्प सादर केला.या अर्थसर्कल्पामध्ये वातानुकुलित १०० इलेक्ट्रिक बस, उर्वरित २० पैकी दहा तेजस्विनी परिवहनच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत. त्यात १२५ कंत्राटी पद्धतीने महिला वाहकांची नेमणूक केली जाणार आहे. या धोरणात्मक निर्णयामुळे महिलांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. याशिवाय, ई-तिकीटसाठी ईटीआयएम मशीन, नादुरु स्त १०३ सीएनजी बसगाड्यांची दुरु स्ती करणे, नवीन ५० मिडी बसऐवजी त्याच खर्चातून शंभर मिनीपोस्ट बस घेण्याची योजनाही आहे. दिव्यांग व्यक्तींना प्रवास भाड्यात सवलत, ज्येष्ठ नागरिकांना त ५० टक्के सवलतअशी अर्थसंकल्पाची वैशिष्टये आहेत.बस निवाऱ्यांवर १०६ एलईडी टीव्ही बसवून त्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्याचे हक्क देणे, परिवहनच्या जागांवर होर्डिंगला परवानगी देणे, चौक्यांवर जाहिरातींचे हक्क देणे, अत्याधुनिक पद्धतीचे निवारे विकसित करणे, परिवहनच्या जागांवर एटीएम सेंटरची उभारणी करणे, बस आगारांमध्ये सौरउर्जा प्रकल्प राबविणे, बसमध्ये एलईडी स्क्रि न लावून जाहिरात प्रसिद्ध करणे, १३० सीएनजी, ५० मिडी आणि ५० तेजस्विनी बसेसचे सुधारित वेळापत्रक तयार करून नवीन वाहतूक मार्गांवर फे-या वाढवून वेळेत बस उपलब्ध करून परिवहनचेही उत्पन्न वाढविण्यावर भर राहणार आहे.* मिडी ऐवजी घेणार मिनी पोस्ट बसबेस्टच्या धर्तीवर मिनी पोस्ट बस खरेदी करणे असे उत्पन्न वाढीचे मार्ग सुचविले आहेत. अर्थसंकल्पात ५० मिडी बस खरेदीची योजना आहे. त्याऐवजी शंभर मिनी पोस्ट खरेदीचा विचार आहे. भविष्यात शहरामध्ये मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर बसऐवजी मेट्रोच्या प्रवाशांची संख्या वाढेल. ही शक्यता गृहित धरून टिएमटीला अंतर्गत मार्गांवर प्रवासी वाहतूक करावी लागेल. त्याअनुषंगाने परिवहन प्रशासनाने मिनी पोस्ट बस खरेदीवर भर दिला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेPublic Transportसार्वजनिक वाहतूकThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका