शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

...अखेर जोशी रुग्णालयाच्या कराराला राज्य सरकारची अंतिम मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 15:38 IST

भाईंदर - राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्याच्या कराराला नुकतीच अंतिम मान्यता दिली आहे.

राजू काळेभाईंदर - राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्याच्या कराराला नुकतीच अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रुग्णालयाचा हस्तांतरणाचा तिढा अखेर सुटल्याने पालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.पालिकेने २०१२ मध्ये बांधलेले हे सर्व साधारण रुग्णालय राज्य सरकारमार्फत चालविण्याचा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर करण्यात आला होता. परंतु त्याचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाने हस्तांतरणाला परवानगी नाकारून ते रुग्णालय पालिकेनेच चालवावे, असा आदेश दिला. त्यामुळे अद्यापपर्यंत हे रुग्णालय पालिकेकडून चालविले जात असले तरी ते राज्य सरकारकडेच हस्तांतरीत व्हावे, यासाठी प्रशासकीय व राजकीय पाठपुरावा सुरू होता. त्याची दखल घेत राज्याचे महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी १० जानेवारी २०१६ रोजीच्या रुग्णालय लोकार्पण सोहळ्यात हे रुग्णालय लवकरच सरकारकडे हस्तांतरीत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्यानंतर अखेर ३० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत रुग्णालय हस्तांतरणाला मान्यता देण्यात आली.रुग्णालय हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते, पालिका -उपायुक्त (आरोग्य विभाग) डॉ. संभाजी पानपट्टे व उपसंचालक, (आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे) डॉ. रत्ना रावखंडे यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्यासाठी मे २०१७पर्यंतची मुदत देण्यात आली. परंतु तांत्रिक अडचणीत सापडलेल्या या रुग्णालयाचे हस्तांतरण रखडले. त्यातच रुग्णालयातील रुग्णसेवा पुरेशी नसल्याचा खटला न्यायप्रविष्ट करण्यात आल्याने रुग्णालयाच्या हस्तांतरणाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु आरोग्य संचालकांमार्फत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होताच पालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालय हस्तांतरणाचा करारनामा ९ आॅगस्ट रोजी राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला. अखेर त्याला काही किरकोळ दुरुस्तीनंतर ३१ आॅक्टोबरला अंतिम मान्यता देण्यात आली. त्याचे पत्र पालिकेला दोन दिवसांपूर्वीच प्राप्त झाल्याने पालिकेच्या डोक्यावरील ओझे ठरलेल्या या रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा तिढा सुटल्याची प्रतिक्रिया प्रशासकीय अधिका-यांकडून व्यक्त होऊ लागली आहे.एकूण चार मजली रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया व अतिदक्षता विभागाचे काम सध्या सुरू असून त्यासाठी सुमारे ३ कोटींची तरतूद पालिकेकडून करण्यात आली आहे. तिस-या मजल्यावरील काम अद्याप अपूर्णावस्थेत असले तरी पालिकेने या मजल्यावर कुपोषित बालकांवरील उपचारासाठी पोषण पुनर्वसन केंद्र काही महिन्यांपूर्वी सुरू केले आहे.रुग्णालय हस्तांतरणासाठी पालिकेला आरोग्य उपसंचालकांसोबत अंतिम सामंजस्य करार करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार असून त्यानंतरच रुग्णालयाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेचा शेवट होणार आहे. हस्तांतरणानंतर मात्र त्यातील कर्मचारी व अधिका-यांना पालिकेकडून पुढील वर्षभरासाठीचे वेतन दिले जाणार आहे. तसेच पालिकेच्या नावे असलेला रुग्णालय जागेचा सातबारा व मालमत्ता पत्र पालिकेला राज्य सरकारच्या नावे करावे लागणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMira Bhayanderमीरा-भाईंदर