शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

अखेर भार्इंदरमधील बंद पोलीस चौक्यांना मिळाले पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 22:28 IST

महापालिकेमार्फत नगरसेवक निधीतून बांधलेल्या व गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या पोलीस चौक्यांना आता पोलीस मिळू लागले आहेत.

मीरा रोड - महापालिकेमार्फत नगरसेवक निधीतून बांधलेल्या व गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या पोलीस चौक्यांना आता पोलीस मिळू लागले आहेत. चौक्या सुरू झाल्याने गुन्हेगारीला आळा बसेल व सुरक्षिततेची भावना वाढेल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक जवळील बालाजी नगर येथे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्या नगरसेवक निधीतून पोलीस चौकी बांधण्यात आली होती. आॅगस्ट २०१४ मध्ये सदर चौकीचे उद्घाटन तत्कालीन महापौर कॅटलीन परेरा, उपअधीक्षक सुहास बावचे आदींच्या हस्ते झाले होते. रेल्वे स्थानकास लागून असलेल्या या परिसरात लूटमार, चोरीपासून अगदी हत्येची देखील घटना घडली होती.काही महिन्यांआधी तर येथील रेल्वेचे तिकीट घर चोरीसाठी फोडण्यात आले होते. रात्री अपरात्री असामाजिक प्रवृत्तींचा असलेला वावर, चेन स्रेचिंग आदींमुळे नागरिकांनी सातत्याने पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी चालवली होती. नगरसेवक पाटील देखील त्यासाठी पत्रव्यवहार करत होते.अखेर सदर चौकीसाठी भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बिश्वास यांची बीट अधिकारी म्हणून सदर चौकीत नियुक्ती केली आहे. त्यामुळे नेहमी बंद राहणारी चौकी आता सुरू झाल्याने येथील गुन्हेगारी प्रवृत्ती व घटनांवर आळा बसेल अशी आशा आहे. पण नियमितपणे त्यातही रात्रीच्या वेळेस पोलिसांची उपस्थिती गरजेची मानली जातेय. बालाजीनगरच्या चौकीप्रमाणेच भार्इंदर पूर्व - पश्चिम जोडणा-या उड्डाणपुलाखाली नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांच्या नगरसेवक निधीमधून पोलीस चौकी बांधण्यात आली होती. सदर चौकी देखील बांधल्यापासून बंदच होती. पोलीस बळ नसल्याचे कारण नेहमी दिले जात होते.खंडेलवाल यांनी चौकी सुरू करावी म्हणून पाठपुरावा चालवला होता. नुकतीच निरीक्षक कांबळे यांनी चौकीची पाहणी केली. या वेळी रहिवासीसुद्धा उपस्थित होते. चौकीची रंगरंगोटी, आवश्यक सुविधा वगैरे उपलब्ध करून देण्याचे ठरले. सदर चौकी देखील सुरू केली जाणार असल्याचे आश्वासन कांबळे यांनी दिल्याचे खंडेलवाल म्हणाले. 

टॅग्स :Policeपोलिस