अखेर मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे गजाआड
By Admin | Updated: March 30, 2017 03:57 IST2017-03-30T03:57:24+5:302017-03-30T03:57:24+5:30
भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुख्य

अखेर मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे गजाआड
ठाणे : भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे याच्यासह आणखी पाच जणांना अटक केली. यात म्हात्रे यांच्यावर गोळीबार आणि चॉपरने हल्ला करणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना ठाणे न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आता आरोपींची संख्या १२ झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
फेब्रुवारीत म्हात्रे हे रात्रीच्या सुमारास घरी जाताना त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचा पुतण्या प्रशांत यानेच साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप केला जात होता. हत्येनंतर प्रशांत फरार झाला होता. दरम्यान, राजकीय हस्तक्षेपानंतर प्रकरण ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी तपासाअंती म्हात्रे यांच्या अंगरक्षकासह पाच जणांना अटक केली. मंगळवारी पथकाचे प्रमुख एन.टी. कदम यांच्या पथकाने पाचगणीतून प्रशांत आणि चिरंजीव म्हात्रे (२०) या दोघांना अटक केली. त्यानंतर, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतून शशिकांत म्हात्रे (३३), कु णाल ऊर्फ नारळ्या म्हात्रे (२८) आणि रजनी ऊर्फ रजनीकांत म्हात्रे यांना अटक केली. कुणाल याने गोळीबार तर चिरंजीव, रजनीकांत या दोघांनी चॉपरने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)