शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एसीपी निपुंगेंवर प्रशासकीय कारवाईला सुरुवात, मुख्यालय प्रमुखांनी काढली हजर होण्याची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 23:01 IST

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईला पोलीस आयुक्तालयाने सुरुवात केली आहे. ते वैद्यकीय रजेच्या कारणास्तव गेल्या आठवडाभरापासून गैरहजर आहेत.

- जितेंद्र कालेकरठाणे, दि. 13 - ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईला पोलीस आयुक्तालयाने सुरुवात केली आहे. ते वैद्यकीय रजेच्या कारणास्तव गेल्या आठवडाभरापासून गैरहजर आहेत. हजर व्हा, अन्यथा तुमच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशा आशयाची नोटीस त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.सुभद्रा या कॉन्स्टेबलने कळवा येथील तिच्या घरी ६ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. त्याच दिवसापासून निपुंगे हे देखील ठाणे शहर नियंत्रण कक्षाला कळवून सिक (वैद्यकीय) रजेवर निघून गेले. परंतु, त्यांनी मुख्यालय-२ चे उपायुक्त संदीप पालवे किंवा मुख्यालय-१ च्या उपायुक्त डॉ. प्रिया नारनवरे यांच्यापैकी कोणालाही याबाबतची माहिती दिली नाही. शिवाय, कळवा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. आता त्यांनी वैद्यकीय रजा घेतली असली, तरी त्याबाबतची कोणतीही अधिकृत कागदपत्रे दिलेली नाहीत. गेले सात दिवस त्यांची वाट पाहिल्यानंतर मुख्यालय-२ चे उपायुक्त पालवे यांनी त्यांना बुधवारी पुणे येथील निवासस्थानी नोटीस बजावली आहे.

काय म्हटले आहे नोटीसमध्ये...‘आपण सिक रिपोर्ट केला आहे. मात्र, मेडिकल रिपोर्ट दिले नाहीत. एकतर, मेडिकल रिपोर्ट सादर करा किंवा स्वत: कर्तव्यावर हजर व्हा. या दोन्हींपैकी काहीच केले नाहीतर तुमच्यावर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल’, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.काय होऊ शकते कारवाई...विनाकारण गैरहजर राहिल्यास वैद्यकीय कारणातही तथ्य आढळले, नाहीतर निपुंगे यांना सक्त ताकीद, सक्तीची रजा किंवा थेट निलंबनापर्यंतही कारवाई होऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे आत्महत्येच्या प्रकरणात तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्यापुढे किंवा प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी संदीप पालवे यांच्यापैकी कुठेतरी निपुंगे यांना हजर राहण्याशिवाय पर्याय नाही. कळवा पोलीस ठाण्याच्या कलम ३०६ च्या प्रकरणात जर तथ्य आढळले, तर त्यांच्यावर अटकेचीही कारवाई होऊ शकते, असेही या अधिकाºयाने सांगितले. 

 

टॅग्स :Policeपोलिस