शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर स्वप्नील पाटीलसह 8 जणावर उल्हासनगरमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल, मूळ प्रकरण काय?

By सदानंद नाईक | Updated: December 28, 2024 19:41 IST

बांधकाम व्यावसायिक राजा गेमनानी यांनी खंडणी मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

उल्हासनगर : शहरातील बांधकाम व्यवसायिक व भाजप पदाधिकारी राजा गेमनानी यांच्याकडे एक कोटीची खंडणी मागणाऱ्या स्वप्निल दिलीप पाटील यांच्यावर एकूण ८ जणावर हिललाईन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून, पाटील व शैलेश तिवारी यांना पोलिसांनी हिललाईन पोलीस ठाण्यात बोलावून चार तास चौकशी केली. 

उल्हासनगर कॅम्प नं- ५, परिसरात राहणारे राजा गेमनानी हे बांधकाम व्यवसायिक व भाजपचे स्थानिक पदाधिकारी आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात काही जण १ कोटीची खंडणी मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांना केली होती. 

अखेर शनिवारी हिललाईन पोलीस ठाण्यात स्वप्नील पाटील, शैलेश तिवारी यांच्यासह एकूण आठ जणावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. गेमनानी यांनी तक्रारीत म्हटले की, त्यांचे गायकवाड पाडा व समतानगर कुर्ला कॅंप येथे बाधकामे सुरु आहेत. या बांधकामाबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे ॲड स्वप्निल पाटील यांनी राजेश गेमनानी यांना महापालिकेतील नगररचना विभागाच्या दालनात भेटून तुम्ही शंभर कोटीचा टीडीआर घोटाळा केला. आम्ही हिलटाऊन, झलक व कलानी सोसायटी या इमारतीच्या तक्रारी केल्या आहेत. तेव्हा तुमच्या बांधकामाच्या तक्रारी करायच्या नसतील तर तुम्ही मला एक कोटी रुपये द्या. अशी मागणी केली. गेमनानी यांनी पाटील यांना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. तेंव्हा पाटील व त्याच्या साथीदारांनी नगरविकास विभागचे प्राधान सचिव आणि संचालक नगररचना विभाग यांना तक्रारी केल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांनी नेताजी चौकात ॲड .स्वप्निल पाटील यांनी माझ्याकडे एक कोटी ऐवजी २५ लाखाची मागणी केली. त्याने सांगितले की मला ही माणसे सांभाळावी लागतात. त्यांनाही पैसे द्यावेत लागतात. असे बोलून वाद मिटवण्यासाठी दबाव टाकला. 

त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांचा एक माणूस माझ्या बंगल्यावर आला. त्या माणसाला मी एका सोनेरी रंगाच्या पिशवीत पाच लाख रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद केले असून, उर्वरित २० लाख दुसऱ्या दिवशी देतो असे सांगितले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

हिललाईन पोलिसानी भारतीय दंड संहिता कलम ३०८ (३ ) ३०८ (५) ३०८ (४) ३५१ (२) ३५२ ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसExtortionखंडणी