शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे कार्टून, नीरव मोदी, मल्ल्या यांच्या छायाचित्रांमुळे फिल्मला परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:29 IST

नरेंद्र मोदींसारखे कार्टुन दिसते. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांची छायाचित्रे आहेत,

ठाणे : नरेंद्र मोदींसारखे कार्टुन दिसते. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांची छायाचित्रे आहेत, म्हणून मीडिया सेंटरचे सचिव मिलिंद दुसाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचार फिल्मला परवानगी नाकारण्याची धक्कादायक माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.राज्य निवडणूक आयोगाने येत्या २४ तासांत हस्तक्षेप करत न्याय द्यावा, अन्यथा निवडणूक प्रचार बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला.राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचाराच्या फिल्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कार्टुन दिसते तसेच हजारो कोटींचा बँक घोटाळा करून देशातून फरार झालेले आरोपी नीरव मोदी, विजय मल्ल्या यांची छायाचित्रे या फिल्ममध्ये आहेत. या कारणामुळे ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व निवडणूक विभागाच्या मीडिया सेंटरचे सेक्रे टरी मिलिंद दुसाने यांनी या प्रचार फिल्मला परवानगी नाकारली आहे. कार्यकर्त्यांवर मानसिक दबाव टाकण्यासाठी, नंदलाल प्रकरणाच्या पोस्टरला चार दिवसांनी उशिरा परवानगी देणे, प्रचाराच्या उर्वरित तीन फिल्मला परवानगीसाठी ताटकळत ठेवणे, प्रचार साहित्याला जाणीवपूर्वक उशिरा परवानगी देणे, हे प्रकार सुरळीत सुरू असलेल्या निवडणुकीच्या कामात खोडा घालणे आणि एका विशिष्ट पक्षाला याचा फायदा व्हावा, यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

>आनंद पराजंपे यांच्या निवडणूक प्रचारासाठी फिल्म बनवण्यात आली होती. या फिल्ममध्ये भाजपला टार्गेट करत नरेंद्र मोदींचे कार्टुन,नीरव मोदी, विजय मल्ल्या यांची छायाचित्रे वापरली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे