उल्हासनगरात गणेश उत्सवापूर्वी रस्त्यातील खड्डे भरा; शिवसेना शिष्टमंडळाची आयुक्ताकडे मागणी
By सदानंद नाईक | Updated: August 31, 2023 18:52 IST2023-08-31T18:50:58+5:302023-08-31T18:52:22+5:30
उल्हासनगर : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यावरही रस्त्यातील खड्डे जैसे थे असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला. गणेशोत्सवापूर्वी रस्ते ...

उल्हासनगरात गणेश उत्सवापूर्वी रस्त्यातील खड्डे भरा; शिवसेना शिष्टमंडळाची आयुक्ताकडे मागणी
उल्हासनगर : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यावरही रस्त्यातील खड्डे जैसे थे असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला. गणेशोत्सवापूर्वी रस्ते चकाचक करण्याची मागणी आमदार बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांच्याशी बैठक घेऊन केली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांच्या दालनात गुरवारी दुपारी १२ वाजता शहरविकास कामे याविषयांसह गणेशोत्सवापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बैठकीचे आयोजन केले होते. शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार बालाजी किणीकर यांनी केले. बैठकी मध्ये गणपती आगमनापूर्वी सर्व रस्ते खड्डे मुक्त करणे, शहरातील पाणी प्रश्न तात्काळ सोडवणे, गाऊन मार्केट(घट्ट गल्ली) येथिल रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करणे, नेताजी उद्यानाचे राखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांकरिता खुला करणे, तसेच उल्हासनगर शहरातील मंजूर झालेली सर्वी थकीत कामे लवकरत लवकर पूर्ण कारण्याच्या विषयावर चर्चा झाली. आयुक्त अजीज शेख यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना कामाबाबत आदेश दिले.
महापालिका आयुक्ता सोबत झालेल्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड, शहर प्रमुख रमेश चव्हाण, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज, नाना बागुल, उमेश कांदे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व महापालिका अधिकारी उपस्थित होते.