शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ईपीएफ न भरल्याने विविध कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 05:46 IST

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची कारवाई

ठाणे : कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम परस्पर हडप करणाऱ्या कंपन्यांवर ठाण्याच्या भविष्य निधी कार्यालयामार्फतफौजदारी कारवाई करण्यात आली आहे. कायद्यानुसार प्रत्येक कंपन्यांनी दरमहिन्याच्या १५ तारखेच्या आत कामगाराच्या वेतनातून १२ टक्के रक्कम आणि तेवढीच रक्कम कंपनीच्या निधीतून संकलित करून ती पीएफ कार्यालयाकडे जमा करणे अभिप्रेत आहे. परंतु, काही कंपन्या कामगारांच्या वेतनातून कापलेल्या रकमेचा परस्पर अपहार करतात, अशी बाब समोर आली होती.

त्यांना चाप लावण्यासाठी केंद्रीय स्तरावर यंत्रणा कार्यान्वित असून त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यांत काही कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मेसर्स श्री समर्थ कन्स्ट्रक्शन ठाणे, मेसर्स दीपा कॉटन भिवंडी आणि एम.व्ही. वाघाडकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा.लि. डोंबिवली अशा काही कंपन्यांचा त्यात समावेश आहे. ही कारवाई सहायक भविष्य निधी आयुक्त उषा शोदे आणि दुर्गेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवर्तन अधिकारी अरु ण दयाल, रौफ शेख व प्रेक्षा उरणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे.दरमहिन्याच्या १५ तारखेपर्यंत पैसे भरासर्व डिफॉल्ट कंपन्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत भविष्य निधीचे पैसे जमा करून दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई टाळण्याचे आवाहन ठाणे भविष्य निधी क्षेत्रीय आयुक्त सुधीर गणवीर यांनी सर्व कंपन्या तसेच आस्थापनांना आवाहन केले आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस