तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:39 IST2021-03-10T04:39:59+5:302021-03-10T04:39:59+5:30

ठाणे: कोपरीतील एका २५ वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या महेश झाडे आणि जॉन्सन गावडर उर्फ तंबी ...

Filed a case against the two who molested the girl | तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे: कोपरीतील एका २५ वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या महेश झाडे आणि जॉन्सन गावडर उर्फ तंबी (रा. कोपरी, ठाणे) या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोन्ही आरोपींना नियमानुसार नोटीस बजावल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.

कोपरीतील या पीडित तरुणीचा महेश आणि त्याचा साथीदार जॉन्सन हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करीत होते. तिच्या घरासमोर येऊन तिच्या आई वडिलांनाही शिवीगाळ करणे तसेच घराच्या गॅलरीसमोर येऊन अश्लील चाळे करणे, अत्यंत अश्लील भाषेत या पीडितेसह तिच्या आईलाही शिवीगाळ करण्याचा प्रकार या दोघांकडून ६ मार्च रोजी रात्री ९ ते ७ मार्च रोजी सकाळी ८.५० वाजण्याच्या सुमारास सुरु होता. या संपूर्ण प्रकाराला कंटाळून या तरुणीने अखेर ८ मार्च २०२१ रोजी कोपरी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध विनयभंग आणि शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक एच. एम. वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Filed a case against the two who molested the girl