‘सेनेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा’
By Admin | Updated: January 26, 2017 03:11 IST2017-01-26T03:11:57+5:302017-01-26T03:11:57+5:30
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असतानाही सत्ताधारी शिवसेनेने तिचा भंग करून तीनहातनाका

‘सेनेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा’
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असतानाही सत्ताधारी शिवसेनेने तिचा भंग करून तीनहातनाका येथे ठाणे आणि मुंबई महापालिकांच्या इमारतीच्या चित्रावर पक्षाच्या ध्वजासह नेत्यांची छायाचित्रे ेदाखवली आहेत. त्यामुळे शिवसेनेची ही कृती आचारसंहिता भंग करणारी असून त्याबाबत या पक्षावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील दक्ष नागरिकांनी नौपाडा पोलिसांकडे केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा फलक लावला असून त्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचे फोटो छापले आहेत. सेनेची ही कृती आचारसंहितेचा भंग करणारी असल्याने या पक्षावर तसे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या पत्रकात केली आहे. (प्रतिनिधी)