शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या कंगनाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 21:03 IST

ठाण्यातील शिवसैनिकांनीही अभिनेत्री कंगना राणावतविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मुंबईची तुलना ‘पीओके’ म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे तसेच मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने कंगना हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्दे शिवसेनेच्या ठाण्यातील आयटी सेलची श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारकंगनाचे मानसिक संतुलन बिघडल्यास मोफत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे अभिनेत्री कंगना राणावतविरुद्ध ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडेच तक्रार केलेली असतांना ठाण्यातील शिवसैनिकांनीही तिच्याविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मुंबईची तुलना ‘पीओके’ म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर केल्यामुळे तसेच मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने कंगना हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी केली. शिवसेनेच्या आयटी सेल विभागाने ही तक्रार सोमवारी सायंकाळी केली.स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर, माजी परिवहन सभापती दशरथ यादव आणि कोपरी-पाचपाखाडी विधानसभा आयटी सेना संघटक अ‍ॅड. शैलेश कदम यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने श्रीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली.मुंबईतील आर्थिक केंद्र तसेच मोठी कार्यालय गुजरातमध्ये हलविण्यात आली आहेत. अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून मुंबईची शान असणारे बॉलिवूड इतर कुठे हलविण्याचा कट तर मुंबईद्रोही लोक किंवा एखादा राजकीय पक्ष शिजविताना दिसत नाही ना ? याचा सखोल शोध घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सदर चौकशीत कंगनाचे मानिसक संतुलन बिघडल्याचे निष्पन्न झाले तर शिवसेना आणि आयटी सेना ठाणे तर्फे तिचे मानसोपचार तज्ज्ञांकडे मोफत उपचार करून देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. १०६ वीर हुतात्म्यांच्या रक्ताने पावन मुंबईची तुलना काश्मिरशी करणा-या तसेच मुंबई पोलिसांच्या कार्यप्रणालीवर अविश्वास दाखवून त्यांची बदनामी करणाºया कंगणाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रKangana Ranautकंगना राणौत