शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

केडीएमसीवर फौजदारी गुन्हा दाखल करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:23 IST

कल्याण पूर्व येथील जरीमरीनगर आणि लक्ष्मीबाग येथे ज्या सोसायट्यांमधील नागरिक कचरा वर्गीकरण करतात, त्यांच्या घरापासून थेट डम्पिंग ग्राउंडपर्यंत कचऱ्याचा होणारा प्रवास प्रत्यक्ष अनुभवला असता

प्रशांत माने कल्याण : कल्याण पूर्व येथील जरीमरीनगर आणि लक्ष्मीबाग येथे ज्या सोसायट्यांमधील नागरिक कचरा वर्गीकरण करतात, त्यांच्या घरापासून थेट डम्पिंग ग्राउंडपर्यंत कचऱ्याचा होणारा प्रवास प्रत्यक्ष अनुभवला असता लोकांनी वर्गीकरण करून दिलेला कचरा घंटागाडीमध्ये एकत्र केला जातो व डम्पिंग ग्राउंडवर एकत्र टाकला जातो, हे धक्कादायक वास्तव नजरेस पडले. आता केडीएमसी प्रशासनावर फौजदारी गुन्हे दाखल करायचे का, असा सवाल कचरा वर्गीकरण करणारे नागरिक विचारत आहेत.‘लोकमत’च्या प्रतिनिधीने जरीमरीनगर व लक्ष्मीबाग या प्रभागातील ज्या सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण केले जाते, त्या सोसायटीला भेट दिली. येथील प्रत्येक घरात ओला व सुका कचरा जमा करण्याकरिता दोन स्वतंत्र कचरापेट्या ठेवलेल्या आहेत. येथील रहिवासी कचरा वर्गीकरण करतात. मात्र, त्यांच्याकडे येणारा सफाई कर्मचारी हा कचरा घेऊन गेल्यावर घंटागाडीत तो एकत्र केला जातो. ही घंटागाडी तेथून डम्पिंग ग्राउंडवर गेली की, तेथे कचरा वाहून नेणाºया गाड्यांची रांग लागली होती. एकत्र केलेला कचरा ओतला जात होता. याबद्दल घंटागाडीचालकाला व डम्पिंग ग्राउंडवरील कर्मचाºयांना विचारले असता, त्यांनी कचरा वेगवेगळा टाकण्याबाबत ना घंटागाडीत स्वतंत्र व्यवस्था आहे, ना डम्पिंग ग्राउंडवर तशी व्यवस्था आहे, असे सांगत कानांवर हात ठेवले.ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याबाबतची मानसिकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे, पण कचरा उचलण्यासाठी येणाºया घंटागाडीमध्ये मात्र वर्गीकरण केलेला कचरा स्वतंत्रपणे ठेवण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे वर्गीकरण करून काय उपयोग, असा सवाल जरीमरीनगरमधील गृहिणी राधिका शिवणकर यांनी केला आहे.सविता कुंभार्डे, कुं दा साळुंखे, गीताबाई सरगड आणि सुमिता चिकणे या महिलांनीही महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. घंटागाडी वेळेवर येत नाही, काही वेळेस येतच नाही. त्यामुळे ओला कचरा घरातच पडून राहतो. आमच्या सोसायटीमध्ये ओल्या कचºयापासून खत करण्याकरिता पुरेशी जागा नाही. शिवाय, सोसायटीची खताची गरज भागल्यावर अतिरिक्त खतनिर्मिती करून काय करायचे, अशी कैफियत त्यांनी मांडली.सुका कचरा घेऊन जाण्याकरिता आठवड्यातील एक दिवस निश्चित करावा व ओला कचरा दररोज घेऊन जाणे गरजेचे आहे, अशीही मागणी त्यांनी केली. महापालिकेची कचरा गोळा करण्याची सध्याची व्यवस्था म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशी असल्याची टीका या महिलांनी केली.लक्ष्मीबाग प्रभागातील महिला एलिझाबेथ मॅथ्यू यांनीही ओल्या आणि सुक्या कचºयाची स्वतंत्रपणे वाहतूक होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये अजूनही प्रबोधनाची गरज आहे, हे कबूल करतानाच केडीएमसी प्रशासनाने आपल्या कृतीतून कचरा वर्गीकरणाकरिता प्रेरणा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.रहिवाशांची कैफियत ऐकल्यावर कचरा गोळा करण्याकरिता येणाºया घंटागाडीकरिता थांबलो. घंटागाडी येताच कचरा गोळा करणाºयाने पटापट ओला व सुका कचरा एकत्रित घंटागाडीत ओतला. अल्पावधीत घंटागाडी कचºयाने काठोकाठ भरली. कचºयाची वाहतूक करणाºया घंटागाडीवरील कर्मचाºयाक डे विचारणा करता नाव न सांगण्याच्या अटीवर तो म्हणाला की, आमच्याकडे स्वतंत्रपणे सुका कचरा वाहून नेण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे एकत्रित कचरा वाहून नेला जातो. गोळा केलेला कचरा मोठ्या गाडीतून एकत्रित डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकला जातो. ठिकठिकाणचा कचरा गोळा केल्यावर घंटागाडीतील कचरा मोठ्या कचरा वाहून नेणाºया कॉम्पॅक्टरमध्ये दाबून बसवण्यात आला. त्यानंतर, कॉम्पॅक्टर डम्पिंग ग्राउंडकडे निघाला.ज्याठिकाणी कचरा डम्प केला जातो, त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता कचरागाड्यांची एकामागोमाग एक भलीमोठी रांग लागली होती. गाडीतील कचरा जलदगतीने ओतून पुन्हा कचरा भरण्याकरिता ती लगबगीने जात होती. त्याठिकाणी असलेल्या कर्मचाºयांना कचºयाच्या वर्गीकरणाबाबत विचारले असता तो त्रासिकपणे म्हणाला की, कचरा वर्गीकरणाच्या कसल्या गप्पा मारता. इथे कचºयाच्या गाड्या उभ्या करण्याचे वांदे झाले आहे. डम्पिंग ग्राउंडवरील व्यवस्थेबाबत त्याने नाराजी व्यक्त केली.