‘दूषित पाणीपुरवठाप्रकरणी गुन्हे दाखल करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:47 IST2020-11-09T23:47:28+5:302020-11-09T23:47:40+5:30
दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना पोटदुखी, कावीळसारख्या विकारांना सामोरे जावे लागत आहे.

‘दूषित पाणीपुरवठाप्रकरणी गुन्हे दाखल करा’
अंबरनाथ : चिखलोली धरणातून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याला आळा न घालणाऱ्या, पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या निष्काळजी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजयुमोच्या पायल कबरे यांनी केली आहे.
जीवन प्राधिकरणाकडून चिखलोली धरणातून गेल्या काही महिन्यांपासून शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, कृष्णनगर प्रभाग ४४ आणि ४५ मध्ये आणि परिसराला दूषित, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार नागरिकांनी निवेदने दिली, तक्रारीसुद्धा केल्या. तरीही, स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपच्या प्रदेश विद्यार्थी विभागाच्या संयोजिका पायल कबरे यांनी संबंधित अ ल करण्याची लेखी मागणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे.
दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना पोटदुखी, कावीळसारख्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये नागरिकांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. पाणीपुरवठ्यात त्वरित सुधारणा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवण्याची मागणी कबरे यांनी केली.