क्षुल्लक कारणावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:42 IST2021-09-03T04:42:16+5:302021-09-03T04:42:16+5:30

----------------------------- तपासणीच्या बहाण्याखाली लूट कल्याण : अजरुन सेन हा २९ वर्षीय युवक सोमवारी रात्री दीडच्या सुमारास बैलबाजार येथून गाडीवरून ...

Fighting for trivial reasons | क्षुल्लक कारणावरून हाणामारी

क्षुल्लक कारणावरून हाणामारी

-----------------------------

तपासणीच्या बहाण्याखाली लूट

कल्याण : अजरुन सेन हा २९ वर्षीय युवक सोमवारी रात्री दीडच्या सुमारास बैलबाजार येथून गाडीवरून जात असताना तिघा भामट्यांनी त्याला अडवून तुझे लायसन्स दाखव, अशी विचारणा केली. यावर अजरुनने यातील तिघांपैकी एकाला लायसन्स दाखविले. तेव्हा एकाने त्याच्या खिशातील मोबाइल काढून घेतला, तर दुसऱ्याने पाठीमागून येऊन अजरुनला मारहाण करण्यास सुरुवात केली. मला का मारता, माझा मोबाइल द्या, अशी मागणी त्याने केल्यावर तिसऱ्यानेही त्याला मारहाण करून तिघांनी मोबाइल आणि खिशातील रोकडसह पलायन केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------------

कामगाराचा मृत्यू

कल्याण : दहाव्या मजल्यावरून खाली पडून कामगाराच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे काम करणाऱ्या संजय कुमार याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १८ ऑगस्टला संध्याकाळी चार वाजता पश्चिमेकडील नारायणवाडीतील ठक्कर पार्किंगजवळील श्रेष्ठ कन्स्ट्रक्शनसच्या ठिकाणी घडली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नागेश कदम यांनी केलेल्या तपासात संबंधित मृत झालेल्या कामगाराला संजयने दहाव्या मजल्यावर विटा आणि प्लास्टरचे काम करून घेताना कोणतीही सुरक्षेची साधने पुरवली नव्हती, असे स्पष्ट झाले. कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संजयविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

--------------------------------------

Web Title: Fighting for trivial reasons