पद्मशाली समाजाचा भिवंडीत मोर्चा

By Admin | Updated: January 14, 2017 06:26 IST2017-01-14T06:26:53+5:302017-01-14T06:26:53+5:30

शहर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात समाजकंटक व गुन्हेगारांनी डोके वर काढून पद्मशाली समाजाला लक्ष्य बनवले आहे. त्यामुळे

The fierce front of the Padmashali community | पद्मशाली समाजाचा भिवंडीत मोर्चा

पद्मशाली समाजाचा भिवंडीत मोर्चा

भिवंडी : शहर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात समाजकंटक व गुन्हेगारांनी डोके वर काढून पद्मशाली समाजाला लक्ष्य बनवले आहे. त्यामुळे समाजात असंतोष पसरला आहे. गुन्हेगारांवर ठोस कारवाईसाठी अखिल पद्मशाली समाजाने शुक्रवारी मूक मोर्चा काढून पोलीस उपायुक्तालयासमोर रास्ता रोको केला.
पद्मानगर, सोनारपाडा येथे तीन दिवसांपूर्वी अनिल दासी या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. त्याच्यावर पुन्हा हल्ला करण्यासाठी गुन्हेगारांनी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तरीदेखील पोलिसांनी कारवाई केली नाही. दोन महिन्यांपूर्वी सत्यनारायण पिल्लामारम या व्यापाऱ्यावर हल्ला करत त्याच्याजवळील ७ लाख ८० हजारांची बॅग पळवली. या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. नित्यानंद तेला याच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध अद्याप पोलिसांना लावता आलेला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The fierce front of the Padmashali community