महिला अधिकाऱ्यास लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST2021-03-18T04:40:59+5:302021-03-18T04:40:59+5:30
भाईंदर : येथील वस्तू व सेवा कर विभागातील वर्ग २ च्या कर अधिकारी मीना सांड्ये (रा. जे.पी.नगर, विरार पश्चिम) ...

महिला अधिकाऱ्यास लाच घेताना अटक
भाईंदर : येथील वस्तू व सेवा कर विभागातील वर्ग २ च्या कर अधिकारी मीना सांड्ये (रा. जे.पी.नगर, विरार पश्चिम) यांना पाच हजारांची लाच घेताना कार्यालयातच बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर युनिटने ही कारवाई केली आहे.
तक्रारदार पेशाने वकील असून त्यांच्या अशिलांचे वार्षिक निर्धारण आदेश करून देण्यासाठी सांड्ये यांनी तक्रारदारकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर युनिटकडे केली. बुधवारी दुपारी उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांच्या पथकाने भाईंदर पश्चिमेत फाटकाजवळ असलेल्या सेवा कर विभागाच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी सांड्ये यांना त्यांच्या सरकारी कार्यालयात तक्रारदारकडून पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
-------------------