शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडच्या नया नगरमध्ये आढळले अर्धवट मातीत पुरलेले स्त्री अर्भक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 22:59 IST

मीरारोडच्या नया नगर भागातील मातृछाया इमारतीच्या आवारात अर्धवट गाडलेलं नवजात मुलीचं अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागातील मातृछाया इमारतीच्या आवारात अर्धवट गाडलेलं नवजात मुलीचं अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेल्वे समांतर मार्गावर असलेल्या मातृछाया या इमारतीच्या आवारात शनिवारी सायंकाळी मुलं खेळत होती. त्यावेळी झाडा जवळ मातीच्या वर आलेला नवजात बाळाच्या शरीराचा काही भाग दिसुन आला. सदर प्रकार मुलांनी घरच्यांना सांगीतल्यावर इमारतीच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणी नया नगर पोलीसांना कळवले असता उपनिरीक्षक मेघा राणे ह्या पोलीस पथकासह आल्या. अर्भकाचा मृतदेह मातीतुन बाहेर काढला असता तो मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले. नवजात स्त्री अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.मुलगी आहे म्हणुन नवजात अर्भकाची हत्या केली असावी असा संशय असुन परिसरातील संबंधित रहिवाशाचे कृत्य असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.नया नगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरु आहे. पोलीस तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगीतले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर