मार्केटिंग क्षेत्रातील ‘तरुण’ महिलेचा सत्कार

By Admin | Updated: March 9, 2017 03:04 IST2017-03-09T03:04:16+5:302017-03-09T03:04:16+5:30

वयाच्या ८० वर्षीही मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या डोंबिवलीतील रोहिणी खंडागळे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा नगरसेवक महेश पाटील यांनी विशेष सत्कार

Felicitated 'Tarun' woman in marketing sector | मार्केटिंग क्षेत्रातील ‘तरुण’ महिलेचा सत्कार

मार्केटिंग क्षेत्रातील ‘तरुण’ महिलेचा सत्कार

डोंबिवली : वयाच्या ८० वर्षीही मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या डोंबिवलीतील रोहिणी खंडागळे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा नगरसेवक महेश पाटील यांनी विशेष सत्कार केला. वय कितीही असो, महिलांनी आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे, असा संदेश या वेळी खंडागळे यांनी उपस्थित महिलांना दिला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा बुधवारी पाटील यांच्यातर्फे अयोध्यानगरी येथे सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला जिल्हा अध्यक्षा उज्वला दुसाणे, समाजसेविका पल्लवी पाटील, नगरसेविका सायली विचारे, रसिका पाटील, डोंबिवली महिला पूर्व मंडलाच्या अश्विनी परांजपे, महिला संघटक मनीषा राणे, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, डोंबिवली पश्चिम महिला अध्यक्षा ममता तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात गीतांजली मालवणकर, सुप्रिया हसबनीस, निर्मला कछवाय, शेवंता जाधव यांचाही हस्ते सत्कार करण्यात आला. खंडागळे या वयातही काम करत आहेत. ते पाहून त्यांच्या कामाचा आदर्श घेतला पाहिजे, असे दुसाणे यांनी सांगितले. या वेळी उपस्थित असलेल्या भाजपा महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. दरम्यान, त्या आधी भाजपाने डोंबिवली रेल्वे स्थानकातील महिलांना गुलाबपुष्प देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
‘मुझ मे है इंदिरा’ला प्रतिसाद
डोंबिवलीत काँग्रेसच्या वतीने ‘मुझ मे हैं इंदिरा’ या उपक्रमांतर्गत महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद देताना महिलांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. तसेच सॅलड सजावट स्पर्धा व प्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे नंदू म्हात्रे, अमित म्हात्रे, सचिन म्हात्रे यांनी सांगितले. या प्रसंगी रत्नप्रभा म्हात्रे, वर्षा गुजर, शारदा पाटील, दिप्ती जोशी, पौर्णिमा राणे, शीला भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

महिलांना बँकांनी अर्थसहाय्य करावे
ठाणे जनता सहकारी बँकेच्या डोंबिवली पश्चिम शाखेतर्फे महिला स्नेह संमेलन पार पडले. या प्रसंगी युग फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. बँकांनी महिलांना अर्थसहाय्य करून स्वावलंबी बनवावे, असे आवाहन या वेळी किरतकर यांनी केले.

Web Title: Felicitated 'Tarun' woman in marketing sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.