स्वच्छतादूतांना ‘आमरस - पुरी’ची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:33+5:302021-05-25T04:45:33+5:30
ठाणे : कोरोनाच्या लाटेत शहराला स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे ठाण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी तोंड ...

स्वच्छतादूतांना ‘आमरस - पुरी’ची मेजवानी
ठाणे : कोरोनाच्या लाटेत शहराला स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे ठाण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी तोंड गोड केले. शहरातील विविध भागात साफसफाई करणार्या या सहाशेपेक्षा अधिक कोरोना योद्धे असलेल्या स्वच्छतादूतांना मनविसे पदाधिकार्यांनी ‘आमरस- पुरी’चे वाटप केले.
सरकारदरबारी असो अथवा सामाजिक जीवनात, नेहमीच उपेक्षा पदरी पडणार्या सफाई कर्मचार्यांकडे कोणत्याच घटकाचे लक्ष जात नाही. मात्र, कोरोनाकाळात सफाई कर्मचार्यांनी शहराच्या स्वच्छतेचे काम उत्तमरित्या पूर्ण केले. त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनातून मानपाडा, रामनगर, दिवा, वर्तकनगर, रामचंद्रनगर, बाटा कम्पाैंड भागात आमरस - पुरीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संदीप चव्हाण, प्रमोद पत्ताडे, मयूर तळेकर, राकेश आंग्रे, अमोल राणे, कुशल पाटील, नीलेश वैती, विवेक भंडारे, सागर वर्तक, प्रसाद होडे, कुणाल मयेकर, अरुण उंबरकर यांनी प्रयत्न केले.
-----------------