शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

काय कुणाची भीती? न्यायालयाचा डोंबिवलीत अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 2:25 AM

केडीएमसीने उशिरा का होईना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरात पट्टे मारून फेरीवाल्यांना १५० मीटरच्या परिसरात व्यवसाय करण्यास निर्बंध घातले. परंतु, या परिसरातही फेरीवाले बिनदिक्कतपणे व्यवसाय करत आहेत. त्यावरून ‘आम्हास काय कोणाची भीती’ अशा आविर्भावात ते वावरत आहेत, असे काहीसे चित्र डोंबिवलीत पाहावयास मिळत आहे.

डोंबिवली : केडीएमसीने उशिरा का होईना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरात पट्टे मारून फेरीवाल्यांना १५० मीटरच्या परिसरात व्यवसाय करण्यास निर्बंध घातले. परंतु, या परिसरातही फेरीवाले बिनदिक्कतपणे व्यवसाय करत आहेत. त्यावरून ‘आम्हास काय कोणाची भीती’ अशा आविर्भावात ते वावरत आहेत, असे काहीसे चित्र डोंबिवलीत पाहावयास मिळत आहे.रेल्वेस्थानक परिसरात व्यवसाय करण्यास मज्जाव केल्याने रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झाल्याकडे लक्ष वेधत फेरीवाल्यांनी गुरुवारी केडीएमसीवर मोर्चा काढला. या वेळी झालेल्या सभेत महापालिकेने हॉकर्स झोनमध्ये आम्हाला व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, त्यासाठी हे झोन अतिक्रमणातून मोकळे करून द्यावेत, अशी मागणी फेरीवाला संघटनांच्या नेत्यांनी केली. दुसरीकडे मोर्चाला परवानगी नसल्याने आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका अधिकाºयांबरोबर केलेली चर्चाही निष्फळ ठरली.दरम्यान, कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यात हयगय करणाºया नऊ कर्मचाºयांना आयुक्त पी. वेलरासू यांनी निलंबित केले होते. ‘फेरीवाला हटाव’ मुळे डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर मोकळा झाला होता. परंतु, पुन्हा अतिक्रमण वाढू लागल्याने वेलरासू यांनी डोंबिवलीतही फेरफटका मारून वास्तव पाहावे, अशी मागणी होत आहे.कारवाई पथकाचाच आशीर्वाद?रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटरवर मारलेल्या पट्ट्याच्या आत परिसरात व्यवसाय करण्यास मज्जाव केला असतानाही फेरीवाल्यांनी आपले ठेले मांडल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. फेरीवालाविरोधी पथकाचे वाहन, पोलीस आणि पालिका कर्मचारीवर्ग उपस्थित असतानाही रेल्वेस्थानक परिसरात राजरोसपणे फेरीवाल्यांचे व्यवसाय सुरू होते. त्यामुळे आयुक्त पी. वेलरासू पथकावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेMNSमनसेdombivaliडोंबिवली